ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
एर्नाकुलम ओखा एक्सप्रेसमधे महिला प्रवाशाचे सव्वा पाच लाख रूपये किमतीचे दागिने आणि रोकड लंपास

एर्नाकुलम ओखा एक्सप्रेसमधे महिला प्रवाशाचे सव्वा पाच लाख रूपये किमतीचे दागिने आणि रोकड लंपास

प्रकाशन: 07 Dec 2021 10:27 PM
वाचन संख्या 49

कणकवली / उमेश परब – एर्नाकुलम ओखा एक्सप्रेसमधुन गावी येणाऱ्या महिला प्रवाशाचे सव्वा पाच लाख रूपये किमतीचे दागिने आणि ९,००० हजाराची रोकड अज्ञात चोरट्याने लुबाडून नेल्याची खळबळजनक घटना मंगळवारी पहाटे ५ वा. च्या सुमारास घडली. रत्नागिरी स्टेशनजवळ रेल्वे ‘स्लो’ होताच हा ऐवज असलेली पर्स महिलेच्या हातातून खेचून घेऊन चालत्या रेल्वेतून उडी टाकुन चोरटा पळाला. महिला प्रवाशी प्रतिभा प्रभाकर तळेकर (६०) रा. फोंडाघाट गडगेसखलवाडी यांनी याबाबत कणकवली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ही जबर लुटीची घटना घडल्यावर प्रतिभा तळेकर यांनी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर तक्रार देण्याचा प्रयत्न केला. परंतु रेल्वे स्थानकात त्यावेळी स्टेशनवर पोलिस व टीसीही नव्हते. शेवटी महिलेने कणकवलीत येऊन तक्रार नोंदविली. प्रतिभा तळेकर आपल्या फिर्यादित म्हणतात, त्या, त्यांचे पती व भाऊ दत्ताराम सोबत ओखा एक्सप्रेस ने गावी येत होत्या. रत्नागिरी स्टेशनजवळ येताच ट्रेन ‘स्लो’ झाली त्यावेळी अनोळखी इसम त्यांच्या सिटच्या बाजुला येऊन उभा राहिला. ट्रेनचा वेग आणखी कमी झाल्यावर ‘त्या’ अनोळखी चोरट्याने ‘त्या’ महिलेच्या हातातील ‘लाल रंगाची’ पर्स खेचुन घेतली आणि ‘तो’ पळत असताना त्यांनी पकडण्याचा पयत्न केला. परंतु ‘तो’ निसटला. त्याने चालत्या गाडीतून उडी टाकून ‘तो’ पसार झाला. यावेळी त्यांनी आरडा-ओरड केल्याने इतर प्रवाशांनीही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता. १ लाख ७० हजार रूपये किमतीचे ४ तोळ वजनाचे सोन्याची साखळी असलेले तीन पदरी सोन्याचे मंगळसुत्र, २० हजार रूपये किमतीची लाल खडा असलेली अर्धा तोळे वजनाची सोन्याची अंगठी, २० हजार रूपये किमतीची दुसरी चौकोनी प्लेन अंगठी, ३५०० रूपयाची लहान मुलाची अंगठी, १ लाख ३० हजार रूपये किमतीच्या दिड-दिड तोळयाच्या दोन चैन, १४० हजार रूपये किमतीच्या अडिज तोळयाचा ३ पदरी सोन्याचा हार, २० हजार रूपये किमतीचे कुड्यासहीत झुमके, १५ हजार रूपये किमतीची नथ व रोख रक्कम ९ हजार रूपये असा ऐवज ‘त्या’ चोरून नेलेल्या पर्समध्ये होता. चोरीची ही घटना रत्नागिरी रेल्वे स्टेशन परिसरात घडल्याने अधिक तपासासाठी हा गुन्हा ‘शुन्य’ नंबरने रत्नागिरी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स