ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
गोवंश रक्षण अभियानातर्फे  गोसेवेत योगदान द्यायचे आवाहन...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

गोवंश रक्षण अभियानातर्फे गोसेवेत योगदान द्यायचे आवाहन...!

प्रकाशन: 26 Nov 2021 11:31 PM
वाचन संख्या 125

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढत्या गोवंश हत्येला पायबंद घालण्याची गरज होती आणि त्याची सुरुवात कुडाळमधून झाली आहे. पकडलेला कंटेनर आज कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये सडत पडला आहे. सोडवलेली जनावरे सरसोली धाम गोशाळेत आहेत. शासकीय पद्धतीने त्यांची निगराणी राखणे अशक्य आहे कारण गुरांच्या सोडवणूकीचा विचार यापूर्वी गंभीरपणे आणि प्रामाणिकपणे झालेला नव्हता, हे सरळच दिसते आहे. यापुढेही पकडलेल्या जनावरांच्या निगराणीचा प्रश्न आणखी जटील होईल, कारण कत्तलीसाठीच्या वाहतुकीचा तिढा आणि किडा अजूनही मरत नाही. साहजिकच, लढाई अजून संपलेली नाही.पकडलेल्या आणि भटक्या गोवंशाची देखभाल करणे, चारा पाणी औषधाची व्यवस्था करणे, गावातल्या शेतकऱ्यांना गोधन वाढवण्यासाठी मदत करणे, शेण गोमूत्र यावर प्रक्रिया करून विविध १६ प्रकारच्या उत्पादनातून चळवळ आर्थिकदृष्ट्या स्थिर करणे आदी गोष्टींवर काम चालू आहे. कमळ प्रतिष्ठान यामधूनच गोसेवा आणि ग्राम अर्थसमृद्धी यांचे नाते दृढ करण्याचे काम यातून करू इच्छित आहे. तरी इच्छुकांनी गोवंश रक्षण अभियानात पुढील सगळ्या कामांपैकी कशात आपला सहयोग देऊ इच्छिता, याबद्दल नक्की कळवावे असे आवाहन गोवंश रक्षण अभियान मार्फत करण्यात आले आहे.

१) गोशाळा व अन्य व्यवस्था निर्मिती आणि देखभाल

२) कायदेशीर मदत विभाग

३) फ्रंटलाईन गोसेवक (बेकायदेशीर कृत्यांना आळा घालणे/जनावरांची व्यवस्था लावणे यासाठीचा फोर्स)

४) सोशल मीडिया यंत्रणा (प्रिंटमीडिया/न्यूजचॅनेल्स/यु ट्यूब/सोशल मीडिया याद्वारे बाजू मांडणे व प्रचार प्रसार करणे)

५) समर्थक गट/हितचिंतक म्हणून काम करणे व होईल त्या पद्धतीने सर्वतोपरी (आर्थिकसह अन्य) मदत करणे

६) आर्थिक यंत्रणा सांभाळणे.

७) दूध/शेण/गोमूत्र यावर संशोधन/विकास व विक्री-वितरण यंत्रणा.

अशा सात गटात गोवंश रक्षण अभियान काम करत आहे.

यात आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया अपेक्षित. यानंतरच इच्छुकांना त्या त्या गटात विभागून इतर ग्रुप बंद करण्यात येतील. सुसूत्र कामासाठी ही रचना गरजेची वाटते. प्रतिक्रिया नोंदणीकरिता 9422957575 या क्रमांकावर संपर्क करायचा असून या अभियानासाठी आर्थिक मदतीची गरज फार मोठ्या प्रमाणावर आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी पुढील बॅन्क डिटेल्स तपासून घेऊन व समाधान तथा खात्री करून त्यावर आपली मदत पाठवायचे आवाहन गोवंश रक्षण अभियानाने केले आहे .

गोवंश रक्षण अभियान
युनियन बँक ऑफ इंडिया
शाखा -ओरोस सिंधुदुर्गनगरी
चालू खाते क्रमांक – 686401010050219
IFSC CODE UBIN0568643
G-pay/Phone pay No. : 9527958889

या क्रमांकावर आपली मदत पाठवावी आणि त्याचा स्क्रीन शॉट वा रिसीट 9422957575/ 9420207055/ 9421036588 यापैकी किमान कोणत्याही एका क्रमांकावर पाठवावा असेही आवाहनात नमूद केले आहे.

फोटो : प्रातिनिधिक

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स