ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मंदिराचा नववा वर्धापनदिन सोहळा १५ डिसेंबर ते १७ डिसेंबर होणार साजरा….!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मंदिराचा नववा वर्धापनदिन सोहळा १५ डिसेंबर ते १७ डिसेंबर होणार साजरा….!

प्रकाशन: 27 Nov 2021 02:24 AM
वाचन संख्या 149

वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मंदिराचा नववा वर्धापनदिन सोहळा १५ डिसेंबर ते १७ डिसेंबर होणार साजरा….!

समारोपादिवशी राज्यस्तरीय एकेरी नृत्यस्पर्धेचेही आयोजन…!

आचरा | अनिकेत पांगे : मालवण तालुक्यातल्या वायंगणी गावातील श्री स्वामी समर्थ मंदिराचा नववा वर्धापनदिन सोहळा तीन दिवस चालणार आहे . दिनांक १५ डिसेंबर ते १७ डिसेंबर कालावधीत रंगणार्या या भक्तीसोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम व विधींसोबतच निखळ सांस्कृतिक उपक्रमही आयोजित केले जात आहेत .
दिनांक १५ डिसेंबर रोजी पहिल्या दिवशी पालखी परिक्रमा,पालखीचे आगमन, महाप्रसाद, नित्य आरती, स्थानिकांची भजने असे कार्यक्रम आहेत तर दुसर्या दिवशी राजोपचार पूजा ,दुग्धाभिषेक व सहस्त्र बिल्वापर्ण अर्पण पूजन, सामुदायिक महापूजा, महाप्रसाद आणि भजने असा कार्यक्रम आहे.
दिनांक १७ डिसेंबर रोजी समारोप असून त्यादिवशी नित्य आरती, महापूजा, अष्टपैलू भक्तीरंग कार्यक्रम मालवण ,आरती ,महाप्रसाद व नंतर कराओके संगीत मेजवानी, हळदीकुंकू कार्यक्रम आणि भजने असे आयोजन करण्यात आले आहे.
१७ डिसेंबरला रात्री नऊ वाजता एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यात आभार प्रदर्शन व सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. त्या कार्यक्रमाचे उद्घाटन मिठबांव सरपंच श्री भाई नरे व श्री.शेखर मोर्वेकर यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गेटवेल हाॅस्पिटल, कणकवली येथील डाॅ.पाकळे उपस्थित राहणार आहेत.
तसेच डाॅक्टर सिद्धेश सकपाळ (त्रिंबक), डाॅक्टर कोळंबकर(पिरावाडी),सौ.संजना रेडकर (सरपंच ,वायंगणी ग्रामपंचायत),सुनिल त्रिंबककर (वायंगणी पोलिस पाटील) आणि मंडळाचे प्रमुख सल्लागार एडव्होकेट उल्हास कुलकर्णी (मालवण) हे विशेष निमंत्रित मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रात्री दहा वाजता राज्यस्तरीय एकेरी नृत्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .
तीन दिवस चालणार्या या सोहळ्याला समस्त स्वामी समर्थ भक्तांनी व परिसरांतील श्रद्धाळूंनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्री. सदानंद राणे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स