ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आपले आईवडिल,आपली शाळा आणि आपले गांव, यांची आठवण ठेवूनच कितीही मोठे व्हावे आपले नांव : श्री.सत्यवान सावंत
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आपले आईवडिल,आपली शाळा आणि आपले गांव, यांची आठवण ठेवूनच कितीही मोठे व्हावे आपले नांव : श्री.सत्यवान सावंत

प्रकाशन: 26 Nov 2021 11:09 PM
वाचन संख्या 179

देवगड तालुक्यातील साळशी हायस्कुल मध्ये गणवेश वाटप व विज्ञान प्रदर्शन

शिरगांव | संतोष साळसकर : आपल्याला घरात आईवडिलांनंतर  शाळेतच चांगले संस्कार मिळतात हे खरे आहे.आयुष्यात कितीही मोठे झालात तरी आईवडिलांना,शाळेला, गावाला कधी विसरू नका.मी याच शाळेत शिकलो.या शाळेने मला घडविले.चांगले संस्कार दिले.या शाळेसाठी, मुलांसाठी जमेल तेवढे मीही मनोभावे  करेनच असे प्रतिपादन साळशी हायस्कूलचे चेअरमन तथा माजी सरपंच सत्यवान सावंत यांनी साळशी हायस्कूलच्या मुलांना संबोधताना सांगितले.
देवगड तालुक्यातील माध्यमिक विद्या मंदिर साळशी येथे शाळा अंतर्गत विज्ञान प्रदर्शन भेट कार्ड आकाश कंदील प्रदर्शन व गणवेश वाटप करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी सुरुवातीला  माध्यमिक विद्या मंदिर साळशी या शाळेच्या नामफलकाचे  अनावरण सरपंच वैभव साळसकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन माजी पं. स.सदस्य सुनील गांवकर यांच्या हस्ते करण्यात आले.भेट कार्ड व चित्र प्रदर्शनाचे उदघाटन  माजी सरपंच अनिल पोकळे यांच्या हस्ते करण्यात आले. आकाश कंदील प्रदर्शन चे उदघाटन माजी सरपंच किशोर साळसकर  व बाळकृष्ण सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.  
यावेळी साळशी गावातील दानशूर व्यक्ती कडून देण्यात आलेल्या गणवेशाचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन सत्यवान सावंत,सरपंच वैभव साळसकर, माजी पंचायत समिती सदस्य सुनील गांवकर  माजी सरपंच अनिल पोकळे ,पेंढारी हायस्कूलचे शिक्षक सत्यपाल लाडगांवकर ,प्रमुख अतिथी म्हणून बाळकृष्ण सावंत,माजी सरपंच किशोर साळसकर,मुख्याध्यापक  माणिक वंजारे,माजी उपसरपंच तथा संस्था सदस्य राजेंद्र साटम,रवींद्र साळसकर, कैलास गावकर,संतोष साळसकर, प्रकाश रावले,निलेश गावकर,गोविंद रावले,सरमळेवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री.गुरव,शिक्षक संजय मराठे,चाफेडचे माजी सरपंच संतोष साळसकर, पुरुषोत्तम साटम,स्वप्नील भरणकर आदींसह ग्रामस्थ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी प्रमुख मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी घेण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात (लहान गटात)-विराज परब प्रथम, सुजल साळसक,र सम्राट साळसकर द्वितीय मधुरा नाईक, प्रज्ञा घाडी ,सुमन लब्दे तृतीय (मोठा गट )हर्षाली पवार, चिन्मयी घाडी प्रथम विशाल भिसे,लोचन देवणे द्वितीय साक्षी ठुकरूल,ईशा घाडी तृतीय- पोस्टर्रस्पर्धांमध्ये (लहान गट )तन्वी राणे – प्रथम विराज परब द्वितीय- सुजल साळसकर तृतीय ,मोठा गट- मानसी लाड- प्रथम चिन्मयी घाडी -द्वितीय ऋग्वेद साटम- तृतीय भेटकार्ड स्पर्धे मध्ये (लहान गट)मधुरा नाईक – प्रथम विराज परब- द्वितीय तन्वी राणे -तृतीय (मोठा गट) चिन्मय घाडी -प्रथम राज साळसकर- द्वितीय हर्षाली पवार – तृतीय  या सर्व  विद्यार्थ्यांना पुरुषोत्तम साटम यांचे मार्गदर्शन लाभले विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षण पेंढारी हायस्कुलचे शिक्षक सत्यपाल गावकर यांनी केले.


यावेळी बोलताना चेअरमन सत्यवान सावंत पुढे म्हणाले की,अनाथाश्रमात तुम्हाला एकवेळ उद्योजकांचे आईवडील दिसतील.पण शेतकऱ्यांचे आईवडील कधीच दिसणार नाहीत. कारण शेतकरी कितीही गरीब असला तरी आपल्या जन्मदात्या आईवडिलांना कधीच अनाथाश्रमात ठेवणार नाही.याचा आदर्श आजच्या तरुण पिढीनी घेतला पाहिजे.कितीही मोठे झालात तरी आपल्या आईवडिलांना विसरू नका असा त्यांनी पुनरुच्चार करत सांगितले.सरपंच वैभव साळसकर म्हणाले की,मुलांनी शिक्षण घेत असताना व्यवसायिक दृष्टीकोन ठेऊन चांगला उद्योजक बनण्याचे स्वप्न बघावे.आजची ही तरुण पिढी ही आपल्या देशाची आधारस्तंभ आहे.या शाळेसाठी मुलांसाठी आणि संस्थेसाठी माझ्याकडून जेव्हढे सहकार्य करता येईल तेव्हडे मी करणार असे सांगितले.माजी सरपंच अनिल पोकळे यांनी बोलताना सांगितले की तुम्हांला आज जो गणवेश मिळाला त्याचे जीवनात फार मोठे महत्व आहे.एकसंघ,शिस्त हे गणवेशाचे प्रतीक आहे.असे सांगत गुरुजनांचा आदर करा,मोबाईलचा वापर शैक्षणिक प्रगतीसाठी करा.परीक्षक म्हणून पेंढारी हायस्कुलचे शिक्षक सत्यपाल गांवकर म्हणाले की, मुलांच्या कल्पकतेला वाव द्या.त्यांच्या प्रगटीकरणाला संधी द्या.आजची शिक्षणपद्धत ही ज्ञानरचनावादी आहे.विद्यार्थ्यांच्या कलेने त्यांना समजून घेऊन तसे त्याच्यावर संस्कार केल्यास तो नक्की हुशार होईल.आजचा विद्यार्थी हा देशाचा भावी आधारस्तंभ आहे.असे सांगितले.माजी पं.स.सदस्य सुनील गांवकर यांनीही सध्याच्या संस्थेच्या आणि शिक्षकांच्या शालेय सेवेबद्दल गौरवोदगार काढले.
या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन पुरुषोत्तम साटम यांनी केले तर प्रस्तावना व आभार स्वप्नील भरणकर  यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स