ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सिंधूदिनांक

सिंधूदिनांक

प्रकाशन: 16 Nov 2021 09:51 AM
वाचन संख्या 54

निवडक दिनविशेष : (सोळा नोव्हेंबर)

१८६८: लॅकियर आणि नान्सेन या शास्त्रज्ञांनी खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करून हेलियमचा शोध लावला. ग्रीक सूर्यदेवता हेलिऑस वरुन त्या वायूला हे नाव देण्यात आले आहे.

१८९३: डॉ. अ‍ॅनी बेझंट यांचे भारतात आगमन.

१९०७: ओक्लाहोमा हे अमेरिकेचे ४६ वे राज्य बनले.

१९१४: अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह सुरू झाली.

१९१५: लाहोर कटातील आरोपी विष्णू गणेश पिंगळे, बागी कर्तार सिंग यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आली.

१९३०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्‍नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन केले.

१९४५: युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.

१९८८: अकरा वर्षांनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकुन बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या.

१९९६: कोकण रेल्वेच्या रत्‍नागिरी – मुंबई मार्गाचा शुभारंभ.

१९९६: चतुरंग प्रतिष्ठान च्या पर्सन ऑफ प्राईड पुरस्कारासाठी मुख्य निवडणुक आयुक्त टी. एन. शेषन यांची निवड.

१९९७: अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना ब्रिटनमधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट प्रदान.

२०००: कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे दिला जाणारा संस्कृत रचना पुरस्कार डॉ. गजानन बाळकृष्ण पळसुले यांना जाहीर.

२०१३: २४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची क्रिकेटमधून निवृती व त्यानंतर काही तासातच त्यास भारतरत्‍न हा भारतातील सर्वोच्‍च नागरी किताब जाहीर झाला. त्याला हा सन्मान सर्वात लहान वयात (४०) मिळाला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स