ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणीचे आवाहन.

जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणीचे आवाहन.

जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणीचे आवाहन.


सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने जिल्ह्यातील उमेदवारांसाठी 'जागतिक कौशल्य स्पर्धा 2026' ही चीन मधील शांघाई येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी https://skillindiadigital.gov.in  या लिंकवर दिनांक ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे.


जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होते आणि जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील तरुणांकरीता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा ही ऑलिम्पिक खेळांसारखीच आहे. यापूर्वी ४७ व्या जागतिक स्पर्धेमध्ये ६३ सेक्टरमधून ५० देशातील १० हजार उमेदवार समाविष्ट झाले होते आणि ही स्पर्धा १५ देशांत १२ आठवड्यासाठी आयोजित करण्यात आली होती. 'जागतिक कौशल्य विकास स्पर्धा 2026' आयोजित करण्याबाबत राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद (NSDC) National Skill Development Council मार्फत मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ५० क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म ०१ जानेवारी २००४ किंवा तद्‌नंतरचा असणे अनिवार्य आहे. तसेच Digital Construction, Cloud Computing, Cyber Security, ICT Network Infrastructure, Additive Manufacturing, Industrial Design Technology, Industry ४.०, Mechatronics, Optoelectronic Technology, Robot System Integration, Water Technology, Dental Prosthetics, Aircraft Maintenance या क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म ०१ जानेवारी २००१ किंवा तद्नंतर असणे अनिवार्य आहे.


जिल्ह्यात कार्यरत असलेल्या (ITIs, Polytechnic, MSME Tools Rooms, CIPET, IIT, Engineering College, IHM, Hospitality Institute, Corporate Technical Institute, Skill Training Institute, Colleges, Maharashtra State Skill University, MSBVET, Private Skill University, Fine Arts College, Flower Training Institute, Institute of Jewellery Making, Others मधील इ. संस्थांमधील उमेदवार यात सहभागी होऊ शकतील, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स