ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
पं. स. सदस्य मिलिंद मेस्त्री यांनी छेडले लाक्षणिक उपोषण

पं. स. सदस्य मिलिंद मेस्त्री यांनी छेडले लाक्षणिक उपोषण

प्रकाशन: 16 Nov 2021 01:10 PM
वाचन संख्या 92

कणकवली | उमेश परब : स्वतःच्या मर्जीतील ठेकेदारांना ठेका न मिळाल्यामुळे ओसरगाव पं स मतदारसंघातील विकासकामे अडवून ठेवल्याबद्दल पं. स. सदस्य मिलिंद मेस्त्री यांनी डीपीडिसी मिटिंगच्या मुहूर्तावरच ओरोस येथे लाक्षणिक उपोषण छेडले आहे. ओसरगाव पं. स मतदारसंघातील ओसरगाव गावठणवाडी येथील साकव बांधणे, ओसरगाव मळीवाडी दीपक धुरी यांच्या घराजवळ साकव बांधणे, वागदे डंगळवाडी संतोष गावडे यांच्या घराजवळील नाल्यावर साकव बांधणे, या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही निविदा खुल्या केल्या नाहीत. निविदा स्पर्धेत शिवसेनेच्या मर्जीतील ठेकेदाराना ठेका मिळाला नसल्यामुळे निविदा खुल्या केल्या नसल्याचा आरोप पं. स. सदस्य मिलिंद मेस्त्री यांनी केला आहे. पालकमंत्री आणि प्रशासनाच्या अजब कारभाराविरोधात डीपीडिसी मिटिंग दिवशी लाक्षणिक उपोषण छेडण्याचा इशारा पं. स. सदस्य मिलिंद मेस्त्री यांनी दिला होता. त्यानुसार आज सकाळी मेस्त्री यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले.

यावेळी वागदे माजी सरपंच संदीप सावंत, समीर प्रभुगावकर, लक्ष्मण घाडीगांवकर, गणेश तळगावकर, प्रदीप गावडे, सुदर्शन राणे आदींनी उपोषणस्थळी जात मेस्त्री यांना पाठिंबा दिला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स