म्हापसा येथील उद्योजक रघुनाथ मेघ:श्याम भांगले यांचे निधन.
बांदा /राकेश परब : म्हापसा येथील उद्योजक श्री रघुनाथ मेघ:श्याम भांगले (वय ९०) यांचे राहत्या घरी रविवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. रविवारी सायंकाळी म्हापसा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुलगे ,दोन विवाहित मुली ,सुना,जावई ,नातवंडे असा परिवार आहे. म्हापसा येथिल पेट्रोलियम तथा टायर व्यवसायिक दत्तप्रसाद भांगले व संतोष भांगले यांचे ते वडिल होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)