ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मल्लखांब एथलीट हिमानी परबला राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्कार प्रदान...!

मल्लखांब एथलीट हिमानी परबला राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्कार प्रदान...!

प्रकाशन: 15 Nov 2021 12:49 PM
वाचन संख्या 90

सिंधुदुर्गच्या कन्येचा झाला राष्ट्रीय सन्मान..!

मसुरे | सौ.प्राजक्ता पेडणेकर : मुंबईतील दादर येथील सुप्रसिद्ध ,श्री समर्थ व्यायाम मंदिराची मल्लखांब खेळाडू हिमानी उत्तम परब हीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन दिल्ली येथे ‘अर्जुन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा बहुमान मिळवणारी हिमानी ही सर्वात युवा खेळाडू ठरली. तिने वयाच्या २० व्या वर्षी हा पुरस्कार पटकावला आहे. मल्लखांब खेळात अर्जुन पुरस्कार मिळवणारी हिमानी ही देशातील पहिली खेळाडू ठरली. विविध स्पर्धांमध्ये १०० पेक्षा जास्त पदकांची कमाई तिने आजवर केली आहे. राज्य शासनाचा ‘शिव छत्रपती’पुरस्कार गतवर्षी तिला प्रदान करण्यात आला होता.
कुडाळ तालुक्यात घर असणारी हिमानी, समर्थ व्यायाम मंदिरात अगदी लहान वयात खेळाडू म्हणून दाखल होऊन ती सध्या प्रशिक्षक म्हणून सुद्धा जबाबदारी पार पाडत आहे.
पुरलेला आणि दोरीचा मल्लखांब या दोन्हींमध्ये सादरीकरण करण्यात हिमानी माहिर आहे. पहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत हिमानीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.या स्पर्धेतील तिच्या कामगिरीची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन तिला ‘शिव छत्रपती’ पुरस्कार दिला होता. तिच्या याच कामगीरीची दखल घेत केंद्र सरकारने सुद्धा हिमानिला मानाचा ‘अर्जुन’ पुरस्कार प्रदान केला आहे.
हिमानी हिने जागतिक स्पर्धेत चार सुवर्ण, दोन ब्रॉंझ पदक जिंकली आहेत. अर्जुन पुरस्कारासाठी देशातील मान्यता प्राप्त क्रीडा संघटना, इंडियन ऑलिम्पिक असोशिएशन (IOA) आणि स्पोर्ट्स अथोरिटी ऑफ इंडियाकडून (SAI) खेळाडूंच्या नावांची शिफारस केली जाते. यासाठी संबंधित खेळाडूंची गेल्या चार वर्षातील कामगिरी, लीडरशिप क्वॉलिटी, स्पोर्ट्समन स्पिरिट आणि अनुशासन या आधारे निवड करण्यात येते. हा पुरस्कार विजेत्या खेळाडूला अर्जुनाची प्रतिमा, प्रशस्तीपत्रक आणि १५ लाख रुपये देण्यात येतात.
हिमानी हिचा तिचे मूळ गाव असलेल्या बांदिवडे येथे वार्षिक गोंधळ कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार आहे.हिमानीला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याने मुंबई तसेच सिंधुदुर्ग मधून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतून हिमानीच्या या सन्मानाची प्रशंसा होत अभिमान व्यक्त केला जात आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स