ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आंब्रड येथे शिवसेनेच्या विकास कामांचा धडाका..!

आंब्रड येथे शिवसेनेच्या विकास कामांचा धडाका..!

प्रकाशन: 08 Nov 2021 11:47 PM
वाचन संख्या 83

खासदार विनायक राऊत आणि आमदार  वैभव नाईक यांची विशेष उपस्थिती

ब्युरो न्यूज | विवेक परब : कुडाळ तालुक्यातील आंब्रड येथील श्री. हनुमान वाचनालय व ग्रंथसंग्रहालयाला आमदार वैभव नाईक यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून दोन संगणक संचांचे वाटप आज करण्यात आले.तसेच आंब्रड भगवती मंदिर येथे प्रवेशद्वार बांधणे, आंब्रड भगवती मंदिर रस्ता डांबरीकरण करणे, टेंबवाडी रस्ता  खडीकरण डांबरीकरण करणे, मोगरणेवाडी रस्ता  खडीकरण डांबरीकरण करणे, दळवीवाडी रस्ता  खडीकरण डांबरीकरण करणे या कामांची भूमिपूजने  खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी आंब्रड येथे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्ष संघटना वाढीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गावातील इतर विकास कामांचा आढावा घेत उर्वरीत कामे येत्या काळात मार्गी लावण्याची ग्वाही खासदार,आमदार यांनी दिली आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, कुडाळ उपसभापती जयभारत पालव, विभाग प्रमुख विकास राऊळ, सरपंच विठ्ठल तेली, उपसरपंच विजय परब, आबा मुंज, प्रवीण  भोगटे, संदीप परब, दिनकर परब, सागर वाळके, निशांत तेरसे, सीताराम दळवी, तात्या मुंज, तात्या आंगणे, विजय परब, जया परब, आदींसह शिवसेना पदाधिकारी, व शिवसैनिक उपस्थित होते.

      

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स