पालकमंत्री नाम. उदय सामंत यांच्या हस्ते झाले जिल्हा कोषागार कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन...!
ओरोस | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा कोषागार कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज झाले.
या उद्घाटन प्रसंगी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा कोषागार अधिकारी शिवप्रसाद खोत, अप्पर कोषागार अधिकारी यशवंत भोसले व कोषागार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा कोषागार कार्यालयाने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारलेल्या बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. जिल्हा कोषागार कार्यालयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवृत्त वेतनधारक, तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण व बैठकांसाठी हे सभागृह प्रस्तावित केले होते. जिल्हा नियोजन समितीच्या सन http://localhost/news/public/uploads/2018-19 च्या मंजूर निधीतून हे सभागृह उभारले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)