सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांत मेघगर्जनेसह मुसळधार...!
🔸तळगांव रामेश्वर महाविद्यालयाचे छप्पर उडाले
🔸 घर ,फळबागायती व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान
ब्यूरो न्यूज | विवेक परब : आज दुपारी साडेतीनच्या दरम्यान मुसळधार पावसासह सोसाट्याच्या वा-यामुळे कुडाळ तालुक्यातील तळगांव येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, रामेश्वर माध्यमिक विद्यालय इमारतीचे छप्पर सोसाट्याच्या वार्याने उडून गेले आहे. त्याच प्रमाणे इतर ठिकाणी गावातील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. फळबागायती, भातशेती यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली दिसत आहे. भरपूर पाऊस व विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे रात्री उशिरापर्यंत पाहणी करताना अडचण निर्माण होत आहेत तसेच नुकसानीचा आकडा उद्योग पर्यंत समजेल असे सरपंच श्री नंदु गावडे यांनी सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)