मालवणात लक्ष्मीपूजनाच्या मंगल संध्येला विजेच्या कडकडाट व गडगडाटासह जोरदार पाऊस..!
बाजारपेठेतील व्यवसाय,पूजन चैतन्य आणि एकूणच उत्साहावर पावसाचे विरजण…!
मालवण | मृणाली शिंदे : दिवाळीच्या मंगल सणाच्या काळात नुकताच सावरु लागलेला मालवणचा व्यापार व बाजार लक्ष्मीपूजनाच्या मंगल संध्येला मात्र अचानक स्तब्ध झाला.
मेघगर्जनेसह जोरदार पावसाने मालवणात अवकाळी हजेरी लावली आहे.
हा पाऊस परतीच्या प्रकारचा पाऊस वाटला तरिही हवामान तज्ञांनी अरबी समुद्रातील बदलत्या घटकांबद्दल व वादळसदृष्य स्थितीबद्दल चर्चा केली होतीच.
तरिही कोरोनानंतरचा एक दिलासा म्हणून व्यापारी बांधव या दिवाळीकडे पाहत असताना अचानक आलेल्या पावसाने मालवण शहर,बाजार व नागरीकांच्या उत्साहावर विरजण घातले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)