ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांदा येथील सागर सावंत मित्र मंडळ आयोजीत नरकासूर स्पर्धेला मिळाला उस्फुर्त प्रतिसाद....!

बांदा येथील सागर सावंत मित्र मंडळ आयोजीत नरकासूर स्पर्धेला मिळाला उस्फुर्त प्रतिसाद....!

प्रकाशन: 05 Nov 2021 10:04 AM
वाचन संख्या 95

माऊली स्पोर्ट्स क्लब सरमळे-पेडणे गोवा यांचा नरकासुर प्रथम

बांदा | राकेश परब : येथील सागर सावंत मित्रमंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या नरकासुर स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत बांदा शहरासह गोवा राज्यातील व ग्रामीण भागातील तब्बल बाराहून अधिक नरकासुर सहभागी झाले होते.
या स्पर्धेत सरमळे-पेडणे-गोवा येथील माऊली स्पोर्टस क्लबच्या नरकासुराने प्रथम क्रमांक मिळविला. क्रेझी बॉईज मित्रमंडळ पेडणे-गोवा यांच्या नरकसुराने द्वितीय क्रमांक, कुलदेव बॉईज सावळवाडा-पेडणे यांच्या नरकासुराने तृतीय क्रमांक मिळविला. चतुर्थ क्रमांक वनलव वरचावाडा, वारखंड-गोवा तर पाचवा क्रमांक नाईक ब्रदर्स, बांदा यांनी मिळविला. उत्तेजनार्थ पारितोषिक राजन कासकर मित्रमंडळ, लकरकोट-पत्रादेवी व आदर्श नगर, तांबोळी यांना देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण रणजित बांदेकर, केदार कणबर्गी व स्वप्नील गडकरी यांनी केले.
येथील बांदेश्वर मंदिर चौकात संपन्न झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. स्वागत सागर सावंत यांनी केले. सूत्रसंचालन नितीन नाईक आणि राकेश परब यांनी केले. या स्पर्धेत एकाहून एक सरस नरकासुर सहभागी झाले होते. रात्री उशिरापर्यंत झालेल्या या स्पर्धेत नरकासुर पाहण्यासाठी बांदावासीयांनी मोठी गर्दी केली होती.
अक्षय मयेकर, सर्वेश मुळये, गौरांक साळगांवकर, गुरुनाथ साळगांवकर, अजय तारी, युसुफ शेख, समीर सावंत, भाई म्हाडगुत यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स