ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
अर्जुन पुरस्कारावर उमटली मूळ सिंधुदुर्गच्या हिमानी परबची मल्लखांब मोहोर...!

अर्जुन पुरस्कारावर उमटली मूळ सिंधुदुर्गच्या हिमानी परबची मल्लखांब मोहोर...!

प्रकाशन: 04 Nov 2021 05:13 PM
वाचन संख्या 73

2021 च्या अर्जुन पुरस्काराची ठरली मानकरी…

13 नोव्हेंबरला मान. राष्ट्रपतींच्या हस्ते मिळणार पुरस्कार ..

मसुरे | सौ.प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मूळ बांदिवडे (सध्या हेदूळ) गांवची वीस वर्षीय सुकन्या व दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिराची मल्लखांब खेळाडू हिमानी परबला केंद्र सरकारचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. मल्लखांब खेळातील हा पुरस्कार मिळविणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. विविध स्पर्धांमध्ये 100 पेक्षा जास्त पदकांची कमाई तिने आजवर केलेली आहे. राज्य शासनाचा शिव छत्रपती पुरस्कार गतवर्षी तिला प्रदान करण्यात आला आहे. तिला जाहीर झालेल्या अर्जुन पुरस्काराचे वितरण १३ नोव्हेंबरला देशाचे राष्ट्रपती मा. रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिल्ली येथे होणार आहे.
परब कुटुंब हे क्रीडा प्रेमी म्हणून ओळखले जाते. तिची मोठी बहीण मल्लखांबपटू होती. तिचाच वारसा हिमानी पुढे चालवत आहे. समर्थ व्यायाम मंदिरात अगदी लहान वयात खेळाडू म्हणून आलेली हिमानी सध्या प्रशिक्षक म्हणून सुद्धा जबाबदारी पार पाडत आहे.  हिमानीला उदय देशपांडे, नीता ताटके, श्रेयस म्हसकर, अस्मिता नायक, अदिती देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
पुरलेला आणि दोरीचा मल्लखांब या दोन्हींमध्ये सादरीकरण करण्यात हिमानी माहिर आहे. तिच्या संचामध्ये चपळता, गतिमानता याचा सुंदर मिलाफ दिसतो. अनेकवेळा अपयश येऊनही ती कधीच खचून गेली नाही. नव्या जिद्दीने चिकाटीने ती पुन्हा उभारी घेते. पहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत हिमानीने सर्वांचेच लक्ष वेधून
घेतले होते.या स्पर्धेतील तिच्या कामगिरीची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन तिला शिव छत्रपती पुरस्कार दिला आहे. तिच्या याच कामगीरीची दखल घेत केंद्र सरकारने सुद्धा हिमानिला मानाचा अर्जुन पुरस्कार जाहीर केला आहे. हिमानीला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याने मुंबई तसेच सिंधुदुर्ग मधून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.
अमेरिकेत होणाऱ्या जागतिक मल्लखांब स्पर्धेत पुन्हा एकदा हिमानीला चांगले यश संपादन करायचे आहे. हिमानीच्या अर्जुन पुरस्कारामुळे श्री समर्थ व्यायाम शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.हिमानीने १० वर्षापेक्षा जास्त काळ विविध स्पर्धात भाग घेऊन सातत्य पूर्ण कामगिरी करून मल्लखांब या खेळात मिळविलेल्या यशाला तोड नाही आहे. तिची मेहनत, परिश्रम आणि जिद्द याचे हे यश असल्याचे हिमानीने वडील उत्तम परब यांनी सांगितले. परब कुटुंबीय सध्या कुडाळ तालुक्यातील हेदुळ कसाल येथिल घरी सुट्टीत येतात. गतवर्षी बांदिवडे येथे तिचा विशेष सत्कार करण्यात आला होता.
जागतिक स्पर्धेत चार सुवर्ण, दोन ब्रॉंझ पदक जिंकली होती. त्यामुळे या पुरस्काराची अपेक्षा होती. नामांकन मिळाले त्यावेळी सुखावले होते. मात्र आता प्रत्यक्ष पुरस्काराची घोषणा झाल्याने खरा आनंद झाला आहे असे अर्जुन पुरस्कार प्राप्त हिमानी परब हिने दै. प्रहार प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले. हिमानी हिने आताच पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तर तिचे वडील दादर शिवाजी पार्क येथील कॅटरिंग कॉलेज येथे नोकरीस आहेत. हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रात अप्रतिम कामगिरी करणाऱ्या देशातील विविध भागातील खेळाडूंना देण्यात येतो. या पुरस्कारासाठी देशातील मान्यता प्राप्त क्रीडा संघटना, इंडियन ऑलिम्पिक
असोशिएशन (IOA) आणि स्पोर्ट्स एथोरिटी ऑफ इंडियाकडून (SAI) खेळाडूंच्या नावाची शिफारस केली जाते. यासाठी संबंधित खेळाडूंची गेल्या चार वर्षातील कामगिरी, लीडरशिप क्वॉलिटी, स्पोर्ट्समन स्पिरिट आणि अनुशासन या आधारे निवड करण्यात येते. हा पुरस्कार विजेत्या खेळाडूला अर्जुनाची प्रतिमा, प्रशस्तीपत्रक आणि १५ लाख रुपये देण्यात येतात.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स