कोविडरुपी नरकासुराच्या तिसर्या लाटेविरुद्ध सज्ज आहेत तीन 'के'....."कोवॅक्सीन, कोविशिल्ड आणि कलमठचे शिवतेजा मित्रमंडळ...!"
शिवतेजा मित्रमंडळामार्फत अनोखी समाज जागृती…!
कणकवली | उमेश परब : कणकवलीजवळील कलमठ येथील शिवतेजा मित्रमंडळाने कोविड प्रतिबंधक लस घेण्याबाबत जनजागृतीसाठी ‘तिसर्या लाटेची घोषणा झाली, लस घ्या लस घ्या’ ‘असो कोव्हॉक्सिन असो कोविडशील्ड लस घ्या’, जो घेईल लस, तो जगले बिनधास्त अशा स्वरुपाचा संदेश देणार्या आगळ्यावेगळ्या नरकासुराची प्रतिकृती तयार करून बाजारपेठ त्यांची मिरवणूक काढून नागरिकांना लसवंत होण्याचे आवाहन केले.
कोरोनाने मागील दिड वर्ष अख्या जगाला वेठीस धरले. कोरोनाच्या प्रादुर्भावाला ब्रेक लावण्यासाठी कडक लॉकडाऊन, निर्बंध लागू करण्यात आले होते. या लॉककाऊन व निर्बंधांमुळे सर्वसामान्यांसह टाळेबंदीत रहावे लागले होते. कोरोनामुळे अर्थचक्र मंदावले होते. या विपरित परिस्थिती बाहेर पडण्यासाठी सरकारांनी विविध उपाययोजना केल्या. त्यातच भारत बायोटेक व सिरम इन्स्टिस्ट्यूट या संस्थांनी भारतीय बनावटीची कोव्हॉक्सिन व कोविल्डशीड या दोन लसी निर्मिती केली. देशातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लसवंत होण्यासाठी व्यापकरुपात केंद्र व राज्य सरकारने खांद्याला खांदा लावून लसीकरणाची मोहीम हाती घेतली असून देशातील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचे उद्दिष्ट सरकारी यंत्रणांनी ठेवले आहे. जास्तीत जास्त नागरिकांना लस घेण्यासाठी व्यापक स्वरुपात विविध माध्यमांतून व उपक्रमांतून जनजागृती केली जात आहे. नकरचतुदर्शीच्यानिमित्ताने ‘लस घ्या, लस घ्या’ असा संदेश देणार्या नरकासुराची प्रतिमा साकारून त्यांची बाजारपेठेत जनजागृती केली. या आगळ्यावेगळ्या नकारसुराच्या प्रतिमा पाहण्यासाठी बाजरापेठेतील व कणकवली शहरसह आजबाजूच्या परिसरातील नागरिकांनी गर्दी होती. शिवतेजा मित्रमंडळाच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेचे नागरिकांनी कौतुक केले. कोरोनाच्या काळात आपल्या जिवाची बाजी लावलेल्या कोरोना योद्धयांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
नरकासुराची प्रतिकृती तयार करण्यासाठी निवृत्त केंद्रप्रमुख नंदकुमार हजारे, अनिकेत कांबळी, सुयोग्य कांबळी, ललित हजारे, परेश कांबळी, मंथन हजारे, राहुल कडूलकर, निश्चिय हुन्नरे, प्रज्ञेश लोकरे, हर्ष हजारे, निखिल हजारे, ऋषिकेश धुमाळे, श्रीनाथ ढवण, सिद्धेश हुन्नरे,नील लोकरे, प्रथम लोकरे, विठ्ठल कांबळी, जीवन हजारे, शशिकांत कांबळी, सचिन कुवळेकर, प्रशांत कांबळी, प्रसाद मठकर, रोहित हजारे, राकेश लोकरे, प्रसाद कांबळी, गौरव हजारे, तुषार हजारे, नितेश कांबळी, शुभम कुवळेकर, महादेव सावंत यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)