ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
हेदूळ गांवची हिमानी ठरली अर्जुन पुरस्काराची मानकरी…! (क्रिडा विशेष)

हेदूळ गांवची हिमानी ठरली अर्जुन पुरस्काराची मानकरी…! (क्रिडा विशेष)

प्रकाशन: 04 Nov 2021 04:15 PM
वाचन संख्या 210

अवघ्या महाराष्ट्राची मान उंचावणारी हेदूळची कन्या ठरली सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूषण….!

पोईप | ओंकार चव्हाण | क्रिडाविशेष : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हेदूळ गावासाठी दिवाळीच्या सणाच्या आनंदात आणखीन भर टाकणारी गोष्ट घडली आहे. भारतीय क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च स्तरावरील मानाच्या पुरस्कारांपैकी असलेल्या अर्जुन पुरस्कारासाठी हेदूळ गांवच्या कु.हिमानी उत्तम परब ह्या मल्लखांबपटूची निवड झाली असून तिच्या या यशाने अवघा सिंधुदुर्ग जिल्हा व हेदूळ गांव अर्जुन पुरस्काराच्या नकाशावर सन्मानाने आला आहे.
हेदूळचे सरपंच श्री.नंदू गावडे , उपसरपंच सौ.दर्शना पुजारे यांनी हिमानीचे विशेष आनंदाने अभिनंदन केले आहे. हेदूळचे ग्रामपंचायत सदस्य श्री भगवान कानडे, श्री मिलिंद हेदुळकर,निलेश पुजारे,सौ.आरती गावडे ,श्रीम. प्रियांका कदम यांनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवसेना शाखा प्रमुख श्री.संतोष हेदळकर उपशाखा प्रमुख श्री.भिकाजी पुजारे यांनी प्रियांकाला खास शिवसेनेच्याही वतीने शुभाशीष देऊन गौरवोद्गार काढले आहेत. अवघा हेदुळ गांव व ग्रामस्थ कु.हिमानी हिच्या अर्जुन पुरस्काराचा आनंद साजरा करुन तिच्या भावी यशासाठी शुभेच्छा देत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स