अवैध गुंराची वाहतूक करणारा कंटेनर कुडाळ येथे नागरिकांनी पकडला
कुडाळ | विवेक परब : नेरुर परिसरातून गुरांची वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते. याबाबत नागरिकांना संशय होता नागरिक यावर बारीक लक्ष ठेऊन होते ते हाती लागत नव्हते. दिवशी दरम्यान आज नेरूरमधून निघालेले कंटेनर शहरातून जात असताना भाजपचे अविनाश पराडकर यांनी पाहिला आणि कंटेनरची पाठलाग करुन संत राऊळ महाराज महाविद्यालया जवळ पकडला त्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिक गोळा झाले आणि कंटेनर चालक आणि क्लीनर यांना कंटेनर उघडण्यास सांगितले मात्र चालकाने उघडण्यास नकार देताच त्यांना नागरिकांनी चोप दिला तद्नंतर नागरिकांनी यातील मुख्य सुत्रधाराला आणावे अशी मागणी केली. दरम्यान याठिकाणी पोलिस दाखल झाले पोलिसांनी याबाबत कारवाई केली जाईल असे सांगून हा कंटेनर ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला आणला. तेथे आणल्यानंतर नागरिकांनी कंटेनर उघडण्याची विनंती केली मात्र पोलिसांनकडून नकार देण्यात आल्यानंतर संतप्त नागरिकांनी कंटेनर उघडला आणि आत मध्ये गुरे दिसून आली. यांनतर पोलिसांनी संबंधितान वर योग्य ती कारवाई करण्यात येईल पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितले. या दरम्यान पोलिस ठाणे परिसर जय श्री राम जयघोषाने दुमदुमला होता. यावेळी भाजपचे अतुल काळसेकर, राजु राऊळ, बंड्या सावंत, शिवप्रेमीचे रमाकांत नाईक, दैवेश रेडकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, प्रसाद नातू, विजय कांबळी, गणेश भोगटे आदी नागरिक उपस्थित होते. दरम्यान अविनाश पराडकर यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल दाखल केली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)