ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जिल्हा बँक संचालक प्रज्ञा परब राष्ट्रवादीत दाखल

जिल्हा बँक संचालक प्रज्ञा परब राष्ट्रवादीत दाखल

प्रकाशन: 31 Oct 2021 12:47 PM
वाचन संख्या 59

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते खांद्यावर घेतला राष्ट्रवादीचा झेंडा


कुडाळ | विवेक परब : जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालिका प्रज्ञा परब यांनी काल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. आगामी काळात होवू घातलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर त्याचा हा प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. दरम्यान सौ. परब यांचे पाटील यांनी स्वागत केले. तसेच तुमचा पक्षात यथोचित सन्मान केला जाईल, असे त्यांनी सांगितले. या प्रवेशाबाबतची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी चार दिवसापुर्वी जाहीर केली होती. तर जिल्ह्यात दौऱ्यावर आलेल्या श्री. पाटील यांच्या उपस्थितीत सौ. परब यांना पक्षात प्रवेश देण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, काका कुडाळकर, एम. के. गावडे, अनंत पिळणकर, अबिद नाईक, अर्चना घारे, पुंडलिक दळवी, प्रफुल्ल सुद्रीक, हर्षद बेग, दर्शना देसाई, सावली पाटकर, उदय भोसले, सुरेश गवस, शफीक खान, हार्दिक शिगले आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स