ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कणकवली व कुडाळ मध्ये युवासेनेच्या सायकल मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

कणकवली व कुडाळ मध्ये युवासेनेच्या सायकल मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

प्रकाशन: 31 Oct 2021 04:33 PM
वाचन संख्या 67

पेट्रोल डिझेलची दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारचा केला निषेध

खुद्द आमदार वैभव नाईक सायकल चालवत मोर्चात झाले सहभागी..

कणकवली | उमेश परब (ब्युरो चीफ,सिंधुदुर्ग) : केंद्र सरकार कडून पेट्रोल डिझेल च्या दरात दिवसेंदिवस वाढ केली जात आहे. यामुळे नागरिक मेटाकुटीस आले आहेत.यापार्श्वभूमीवर युवासेनेच्या वतीने केंद्र सरकारच्या निषेधार्थ कणकवली व कुडाळ येथे भव्य सायकल मोर्चा काढण्यात आला.कणकवली येथील मोर्चाचे नेतृत्व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केले होते. आ.वैभव नाईक स्वतः सायकल चालवत सायकल मोर्चात सहभागी झाले. या सायकल मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून ते हायवेवरून पटवर्धन चौक ते बाजारपेठ मार्गे ढालकाठी येथून तेलीआळी मार्गे छ.शिवाजी महाराज चौकातून शिवसेना मध्यवर्ती कार्यालया पर्यंत हा सायकल मोर्चा काढण्यात आला.तर कुडाळ येथे गुलमोहर हॉटेल ते जिजामाता चौक पर्यंत भव्य सायकल मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकारचा निषेध असो, मोदी सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय, पेट्रोल डिझेल दरवाढ कमी करा नाहीतर खुर्ची खाली करा.इंधन दरवाढ कमी झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी कुडाळ येथे युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, शहरप्रमुख संतोष शिरसाट, संजय भोगटे, युवासेना समन्वयक सुशील चिंदरकर, तालुकाप्रमुख योगेश धुरी,सोशल मीडिया जिल्हाप्रमुख अनुराग सावंत अमित भोगले, मंजू फडके,चिन्मय पोईपकर, संदीप म्हाडेश्वर,चेतन पडते, दिनार पडते आदी.
कणकवली येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, सचिन सावंत,नगरसेवक कन्हैया पारकर, सुशांत नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख गीतेश कडू, समन्वयक राजू राठोड, कणकवली तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर,तेजस राणे,रिमेश चव्हाण,आदींसह युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स