ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
कणकवलीत विजयराव नाईक फार्मसी कॉलेजचा दीक्षांत समारंभ उत्साहात.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कणकवलीत विजयराव नाईक फार्मसी कॉलेजचा दीक्षांत समारंभ उत्साहात.

प्रकाशन: 28 Jul 2025 07:21 PM
वाचन संख्या 316

कणकवली | ब्यूरो न्यूज : युवक कल्याण संघ संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीचा दुसरा दीक्षांत समारंभ महाविद्यालयात शनिवार, दिनांक २६ जुलै २०२५ रोजी संपन्न झाला. हा दीक्षांत समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या पूर्वसूचनेनुसार घेण्यात आला. हा दीक्षांत समारंभ उन्हाळी सत्र २०२४ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने आयोजित केला होता. 


Article image


या दीक्षांत समारंभास संस्थेचे सचिव डॉ. रमण बाणे, व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा. मंदार सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश जगताप, उपप्राचार्य डॉ. अमोल उबाळे, विभाग प्रमुख प्रा. अमर कुलकर्णी व प्रा. नमिता सागवेकर आणि परीक्षा विभाग प्रमुख प्रा. ऋषीकेश सोरटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान जवळजवळ ६६ विद्यार्थ्यांना औषध निर्माता शपथ घेऊन पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपले मनोगत व्यक्त केले. तसेच GPAT आणि NIPER या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल कु. भक्ती वायंगणकर या विद्यार्थिनीचाही सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रमादरम्यान डॉ. रमण बाणे यांनी दिलेली आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयाची माहिती येणाऱ्या ऑनलाइनच्या युगात खूप महत्त्वाची ठरेल. तसेच प्रा. मंदार सावंत यांनी विद्यार्थ्यांना कधीही भविष्यात महाविद्यालयाची गरज भासली तर विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाचे दरवाजे कायमच खुले असतील या शब्दात विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शविला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश जगताप यांनी फार्मसी क्षेत्राचे महत्त्व आणि आपला पूर्व खडतर प्रवास सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.


युवक कल्याण संघाचे अध्यक्ष श्री. वैभव नाईक, उपाध्यक्षा सौ. स्नेहा नाईक, सचिव डॉ. रमण बाणे आणि व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा. मंदार सावंत यांनी दीक्षांत समारंभाच्या आयोजनासाठी विशेष कौतुक केले.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नेहा गुरव यांनी केले व डॉ. अमोल उबाळे यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे आभार मानून दीक्षांत समारंभाची सांगता केली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स