मसदे - चुनवरे उपसरपंच पदी शमिका वाडकर यांची बिनविरोध निवड.
पोईप | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील मसदे - चुनवरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ. शमिका शिवराम वाडकर यांची बिनविरोध निवड आली. ग्रामपंचायत कार्यालय मसदे -चुनवरे झालेल्या कार्यक्रमावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उप जिल्हाप्रमुख विश्वास गावकर, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, मालवण शहरप्रमुख दीपक पाटकर, माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर, मसदे - चुनवरे सरपंच श्रीमती. श्रेया महेश परब, ग्रामपंचायत सदस्या केतकी प्रभू, धनश्री कांदळकर, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, पोईप सरपंच श्रीधर नाईक, विनायक बाईत, निलेश बाईत, जितेंद्र परब, दत्ताराम आंबेरकर, रामदास पांजरी, विलास पांजरी; मुकेश नार्वेकर, प्रकाश वेंगुर्लेकर, हरिश्चंद्र खामकर कमलेश प्रभू अनिल जाधव, अमोल वाडकर, प्रितेश पाटकर, तसेच मसदे - चुनवरे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
मागिल दोन वर्षे मसदे -चुनवरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद रिक्त होते तत्कालीन उपसरपंच कलाधर कुशे यांचे निधन झाल्याने हे पद रिक्त झाले होते. ग्रामपंचायत अधिकारी महेंद्र मोरे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. उपसरपंचपदासाठी शमिका वाडकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची सर्वानूमुते बिनविरोध निवड करण्यात आली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)