ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
दहावी - बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर.

दहावी - बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर.

प्रकाशन: 29 Jul 2025 07:27 PM
वाचन संख्या 168


गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी ३० जुलै ते ८ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज कालावधी. 



सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) जून-जुलै २०२५ ची लेखी परीक्षा दिनांक २४ जून २०२५ ते ०८ जुलै २०२५ या कालावधीत व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) ची लेखी परीक्षा दिनांक २४ जून २०२५ ते १४ जुलै २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दहावी परीक्षेसाठी दोन केंद्र व बारावी परीक्षेसाठी दोन केंद्र होती. 


सिंधुदुर्ग जिल्ह्याची दहावी परीक्षेची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ५१.०६ टक्के आहे. यामध्ये ४७ प्रविष्ट विद्यार्थ्यांमधून २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर बारावी परीक्षेची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ४६.५५ टक्के आहे. यामध्ये ५८ प्रविष्ट विद्यार्थ्यांमधून २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाखानिहाय उत्तीर्णतेची टक्केवारी

विज्ञान - ७२.७२ टक्के

कला - १८.१८ टक्के

वाणिज्य - ६०.०० टक्के

व्यावसायिक विषय - २५.०० टक्के


सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे विभागीय मंडळातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे. 


ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांस स्वतःच्या अनिवार्य विषयापैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादीत केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती या विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना स्वतः अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी व छायाप्रतीसाठी बुधवार, ३० जुलै २०२५ ते शुक्रवार, ०८ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबत ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card / Credit Card / UPI / Net Banking) याद्वारे भरता येईल.


जून-जुलै २०२५ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेमध्ये सर्व विषयांसह प्रथम प्रविष्ट होऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी/गुण सुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी तरतुदींच्या अधीन राहून लगतच्या तीन संधी (फेब्रुवारी मार्च २०२६ जून-जुलै २०२६ व (फेब्रुवारी- मार्च २०२७) उपलब्ध राहतील.


फेब्रुवारी मार्च २०२६ मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेस ज्या विद्यार्थ्यांना प्रविष्ट व्हावयाचे आहे अशा नियमित पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत प्रविष्ट होणारे व ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) द्वारे Transfer of Credit घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदन पत्रे ऑनलाईन पध्दतीने स्विकारली जातील. त्याच्या तारखा मंडळामार्फत जाहीर करण्यात येतील, अशी माहिती कोकण विभागीय मंडळ, रत्नागिरीचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर व प्र. विभागीय सचिव बसवेश्वर किल्लेदार यांनी दिली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स