जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाची जिल्हा कार्यकारिणी सभा.
जिल्हा संघटकांची निवड जाहीर.
जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांची अध्यक्षीय उपस्थिती.
मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाची जिल्हा कार्यकारिणी ची सभा सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था ओरोस सभागृहात २६ जुलै रोजी जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

यावेळी कोलगाव हायस्कूल सावंतवाडीचे शिक्षक प्रशांत चव्हाण तर अ. रा. विद्यालय वैभववाडी प्रशालेचे राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संदिप शिंदे याची जिल्हा संघटकपदाची निवड जाहीर करण्यात आली.
या सभेत शिक्षकांसमोर उभ्या असलेल्या, भविष्यकालीन समस्यांबाबत चर्चा करण्यात आली, सभासदांच्या शिक्षण विभागातील प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करून एप्रिल महीन्यात झालेल्या सहविचार सभेमध्ये शिक्षणाधिकारी यांच्या समोर मांडलेल्या प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. तालुका कार्यकारिणी यांच्या फेरनिवडी , तालुका दौरे, नवीन सभासद बनवणे, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व एनएमएमएस सराव परिक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष अजय शिंदे, सचिव विजय मयेकर, उपाध्यक्ष संजय परब, राज्य समन्वयक पांडुरंग काळे, फेडरेशन प्रतिनिधी अशोक गीते, सुदीन पेडणेकर, अर्जुन माळी, मारुती पुजारी, दिगंबर मोर्ये, संभाजी कोरे, भाऊसाहेब चवरे, संजय शेवाळे, राहुल समुद्रे, दत्ताराम कोकरे, आप्पाजी मोहीते, माधुरी खराडे, संगिता पाटील, मंदार चोरगे, प्रशांत चव्हाण, संजु राणे, श्री. बागुल , श्री. वगरे, श्री. केंगले, श्री. हाकेआदी मान्यवर उपस्थित होते.
नूतन जिल्हा संघटक प्रशांत चव्हाण व संदीप शिंदे यांना संघटनेच्या वतीने, जिल्हाध्यक्ष अजय शिंदे व जिल्हा कार्यवाह विजय मयेकर यांच्या हस्ते सोनचाफ्याचे रोप देऊन अभिनंदन करण्यात आले आणि पुढील वाटचालीसाठी सदिच्छा देण्यात आल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)