ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
श्री देवी घुमडाई मंदिरात २९ जुलै पासून नामांकित भजनी बुवांचा भजन महोत्सव.

श्री देवी घुमडाई मंदिरात २९ जुलै पासून नामांकित भजनी बुवांचा भजन महोत्सव.

प्रकाशन: 28 Jul 2025 11:51 AM
वाचन संख्या 210

मालवण | ब्यूरो न्यूज : घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाई मंदिरात आयोजित श्रावणधारा महोत्सवा अंतर्गत शिवसेना जिल्हाप्रमुख देवदत्त (दत्ता) सामंत पुरस्कृत व घुमडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने २९ जुलै पासून भजनमहर्षी कै. पंढरीनाथ घाडीगांवकर स्मृतीप्रित्यर्थ नामांकित भजनी बुवांचा भजन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे हे ११ वे वर्ष आहे. हा महोत्सव १९ ऑगस्ट पर्यंत असणार आहे.


मंगळवार, २९ जुलै रोजी सकाळी ९ वा. धार्मिक कार्यक्रम, सायं. ७ वा. श्री सदगुरु संगीत भजन मंडळ, कुडाळ (बुवा वैभव सावंत), रात्रौ ८.३० वा. श्री विमलेश्वर प्रासादिक भजन मंडळ, परेल मुंबई (बुवा – दुर्वास गुरव), मंगळवार, ०५ ऑगस्ट सकाळी ९ वा. धार्मिक कार्यक्रम व दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायं. ७ वा. श्री गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ, वडखोल वेंगुर्ले (बुवा – रूपेंद्र परब), रात्रौ ८.३० वा. श्री लिंग माऊली प्रासादिक भजन मंडळ, सांताक्रुज मुंबई (बुवा श्रीधर मुणगेकर), गुरुवार, ७ ऑगस्ट सायं. ७ वा. संयुक्त दशावतारांचा संघर्षमय दशावतारी नाट्यप्रयोग 'काशी भविष्यकथन' होणार आहे. यात कलाकार गणपती - दिलीप सुतार, ब्रम्हदेव - मामा माळकर, रिध्दी सिध्दी - भावेश तळासकर, पार्वती - गोट्या येरागी, इंद्र - केशव खांबल, नारद - चारु मांजरेकर, योगिनी - शिवा मेस्त्री, देवदास - नारायण आशियेकर, अनांग मोहिनी - सुधीर तांडेल, अग्नी- सागर गावकर, शंकर- दत्तप्रसाद शेणई, यमधर्म- उदय मोर्ये, गणपती- गौरव शिर्के, ज्योतिषी - संदेश वेंगुर्लेकर, ब्राम्हण- प्रथमेश सामंत, महाविष्णु - देवेंद्र कुडव, संगीत साथ - हार्मोनियम पप्पु घाडीगावकर, मृदंग पियुष खंदारे, तालरक्षक विनायक सावंत यांचा समावेश आहे. त्यांना विशेष सहाय्य – मामा माळकर पुरस्कृत बाळकृष्ण दशावतार नाट्यमंडळ मालवण कोळंब (भटवाडी) यांचे लाभणार आहे.


मंगळवार, १२ ऑगस्ट रोजी सायं. ७ वा. श्री भुतनाथ प्रासादिक भजन मंडळ, वायरी मालवण, बुवा – भालचंद्र केळुसकर, रात्रौ ८.३० वा. श्री दत्तप्रासादिक भजन मंडळ, भांडुप मुंबई. बुवा – भगवान लोकरे. गुरुवार, १४ ऑगस्ट सकाळी ८ वा. लघुरुद्र, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं. ७ वा. संयुक्त दशावतारांचा संघर्षमय दशावतारी नाट्यप्रयोग 'कालचक्र' होणार आहे. यात कलाकार गणपती- काका कलिंगण, रिद्धी सिद्धी - योगेश वस्त, देवराज इंद्र- बबलु मेस्त्री, यमधर्म- दादा राणेकोनस्कर, राजा सुशील- विलास तेंडुलकर, राणी उर्वी- संजय लाड, अधमासूर - पिट्या दळवी, नारद सुभाष लोंडे, शंकर- उदय राणेकोनस्कर, राजकन्या धुती- यश जळवी, यती - उल्हास नाईक, ब्राम्हण-काका कलिंगण, माळी - सुधीर देवळी यांचा समावेश आहे. त्यांना संगितसाथ हार्मोनियम आशिष तवटे, मृदूंग चंद्रकांत खोत, तालरक्षक राजू कलिंगण देणार आहेत. तर विशेष सहाय्य – लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर यांचे लाभणार आहे.


मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा. धार्मिक कार्यक्रम व दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायं. ७ वा. श्री वडचीदेवी प्रासादिक भजन मंडळ, लिंगडाळ देवगड (बुवा संदीप लोके), रात्रौ ८.३० वा. श्री गंभिरेश्वर प्रासादिक भजन मंडळ, घाटकोपर मुंबई, (बुवा लक्ष्मण गुरव) यांची भजन सेवा होणार आहे. भजन रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन घुमडे ग्रामस्थ मंडळ, घुमडे - मालवण यांनी केले आहे अशी माहिती मिळत आहे

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स