मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचा ॲथलीट कु. सोहम चव्हाण याची विभागीय स्पर्धेच्या पात्रतेची 'उंच उडी...!'
मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचा ॲथलीट कु. सोहम चव्हाण याची विभागीय स्पर्धेच्या पात्रतेची 'उंच उडी...!'
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचा विद्यार्थी व ॲथलीट कु. सोहम चव्हाण याने, जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत उंच उडी क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक आणि १०० मीटर धावणे प्रकारात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. त्याची ह्या कामगिरीच्या जोरावर विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्रता निश्चित झाली आहे. रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ॲन्थनी डिसोझा यांनी कु. सोहम चव्हाण आणि जिल्हास्तरीय स्पर्धेतील रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे सर्व सहभागी ॲथलीटस यांची प्रशंसा केली आहे.
रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचा ॲथलीट कु. सोहम चव्हाण याला क्रीडा शिक्षक स्वप्निल तांबे व सहकारी क्रीडा प्रशिक्षक जेवी फर्नांडिस यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
कु. सोहम चव्हाण याच्या यशाबद्दल, रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ॲन्थनी डिसोझा यांच्यासह शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी आणि पालकांनी अभिनंदन केले असून त्याला विभागीय स्पर्धेसाठी सदिच्छा दिल्या आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
रोझरी इंग्लिश स्कूल, मालवणच्या मुलींची विभागीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड.
रोझरी इंग्लिश स्कूल, मालवणच्या मुलींची विभाग...
मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांमध्ये रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या ॲथलीटसची चमकदार कामगिरीसह जिल्हास्तरावर धडक..!
पोईप गावचा मुंबईस्थित सुपुत्र कु. अक्षर रमाकांत पालव याला जागतिक कराटे स्पर्धेत दोन सिल्वर व एक ब्राॅन्झ मेडल प्राप्त.
रोझरी इंग्लिश स्कूलची मालवण तालुकास्तरीय खो - खो स्पर्धेत चषकीय कामगिरी.
रोझरी इंग्लिश स्कूलची मालवण तालुकास्तरीय खो ...