मुणगे हायस्कूल येथे शैक्षणिक साहित्य वाटप व शिक्षक सन्मान सोहळा संपन्न.
मसुरे | प्रतिनिधी : मुणगे ग्रामपंचायत सदस्या सौ. रवीना मालाडकर यांच्या वतीने श्री भगवती हायस्कूल मुणगे येथील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप व शिक्षक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी सभापती सुनील पारकर, माजी मुख्याध्यापक संजय बांबुळकर, सरपंच अंजली सावंत, उपसरपंच दशरथ मुणगेकर, माजी उपसरपंच धर्माजी आडकर, मुख्याध्यापिका कुंज मॅडम, तंटा मुक्ती अध्यक्ष राजू पुजारे व शिक्षक , विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी सुनील पारकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मागील अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवत असताना शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप व विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास, त्यांच्या कलागुणांना वाव देत, सातत्याने त्यांच्या पावलाबरोबर प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षक वर्गाचा शाल व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रशालेच्या वतीने प्रभाग सेविका रवीना मालाडकर यांचे आभार मानण्यात आले. शाळेचा माजी विद्यार्थी मयुरेश पुजारे याची एनसीसी प्रशिक्षण कॅम्प मधून राज्यस्तरीवर थलसैनिक कॅम्पसाठी निवड झाल्याबद्दल प्रभाग सेविका रवीना मालाडकर यांनी भेटवस्तू देऊन सन्मानित केले. इयत्ता आठवीचा विद्यार्थी दक्षेश मांजरेकर याने शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बागवे यांनी केले तर आभार गौरी तवटे यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)