ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
कुडाळमध्ये हृदयरोगग्रस्त प्रवर्गातील मुलांसाठी ०१ ऑगस्ट रोजी मोफत 2D इको तपासणी शिबीर.

कुडाळमध्ये हृदयरोगग्रस्त प्रवर्गातील मुलांसाठी ०१ ऑगस्ट रोजी मोफत 2D इको तपासणी शिबीर.

प्रकाशन: 26 Jul 2025 07:10 AM
वाचन संख्या 184

कुडाळ | प्रतिनिधी : जन्मजात बालकापासून १८ वर्ष वयोगटातील हृदयरोगग्रस्त प्रवर्गातील मुलांसाठी 2D इको तपासणी शिबीर शुक्रवार, ०१ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या शिबीरामध्ये हृदयरोग निदान झालेल्या बालकांना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सामंजस्य करार झालेल्या बालाजी हॉस्पिटल मुंबई, रहेजा हॉस्पिटल मुंबई, कोकिलाबेन हॉस्पिटल मुंबई, फोर्टिस हॉस्पिटल मुंबई, अपोलो हॉस्पिटल मुंबई, ॲपल सरस्वती कोल्हापूर, ज्युपिटर हॉस्पिटल पुणे या शासन मान्यता प्राप्त रुग्णालयात संदर्भीत करून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. 


तरी हृदयरोगग्रस्त प्रवर्गातील जास्तीत जास्त बालकांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक श्री. राजेश पारधी (९४२२३७३१८८) यांच्याशी संपर्क साधावा.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स