ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कोमसाप कणकवली शाखा कार्यकारी मंडळ निवड.

कोमसाप कणकवली शाखा कार्यकारी मंडळ निवड.

प्रकाशन: 27 Jul 2025 08:55 PM
वाचन संख्या 311

अध्यक्षपदी माधव कदम तर कार्यवाहपदी निलेश ठाकूर.


जिल्हाध्यक्ष मंगेश मसके आणि जिल्हा संघटक कवि रूजारिओ पिंटो व साहित्यिका सौ वृंदा कांबळी यांची उपस्थिती.


Article image


कणकवली | ब्यूरो न्यूज : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कणकवली शाखा अध्यक्षपदी माधव कदम यांची तर कार्यवाहपदी निलेश ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. कोमसापच्या कणकवली शाखेच्या सदस्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा कणकवली येथील विद्यामंदिर हायस्कूल सभागृहात संपन्न झाली. 

यासभेत कणकवली शाखेच्या कार्यकारी मंडळाची तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली. कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तर जिल्हा संघटक कवि रूजारिओ पिंटो आणि साहित्यिका सौ. वृंदा कांबळी हे दोन ज्येष्ठ साहित्यिक सदस्य निरीक्षक म्हणून उपस्थित होते. 


कणकवली शाखेचे पुढील तीन वर्षासाठी निवडण्यात आलेले कार्यकारीमंडळ : अध्यक्ष माधव कदम, उपाध्यक्ष अशोक करंबळेकर आणि राजस रेगे, कोषाध्यक्ष सिद्धेश खटावकर, कार्यवाह निलेश ठाकूर, सहकार्यवाह अमर पवार अशी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून संदिप वालावलकर यांची निवड करण्यात आली. 


कार्यकारी मंडळ सदस्य पुढीलप्रमाणे : सौ. रिमा भोसले, सौ. निकिता ठाकूर, श्री. चिराग बांदेकर आणि गणेश जेठे. 


या सभेच्या सुरवातीला, सिद्धेश खटावकर यांनी स्वागत केले. मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्यात आले. त्यानंतर श्री. खटावकर यांनी मागील कामकाजाचा अहवाल सादर केला. श्री. करंबळेकर यांनी वार्षिक जमा खर्च सादर केला. त्यास मंजूरी देण्यात आली. जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांनी सर्व नविन पदाधिकारी व कार्यकारी मंडळाचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि कणकवली शाखेने पुढील काळात विविध साहित्यिक उपक्रम राबवून शाखा आदर्श बनवावी असे आवाहन केले.


यावेळी बोलताना श्री. माधव कदम यांनी शाखाध्यक्षपदी आपली फेर निवड केल्याबद्दल उपस्थित सदस्यांचे आभार मानले आणि कणकवली तालुक्यात विविध साहित्यिक उपक्रम राबविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. 



या सभेला विद्यामंदिर हायस्कूलचे प्राचार्य पी. जे. कांबळे, ज्येष्ठ पत्रकार गणपत उर्फ भाई चव्हाण, साहित्यिक राजन भोसले तसेच कोमसापचे अन्य साहित्यिक सदस्य उपस्थित होते.


मंगेश मसके, रूजारिओ पिंटो, सौ. वृंदा कांबळी, अशोक करंबेळकर, राजस रेगे, निलेश ठाकूर. पी. जे. कांबळे सौ.रिमा भोसले, निकिता ठाकूर व उपस्थितांनी, नूतन कार्यकारी मंडळाला सदिच्छा देत अभिनंदन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 277

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स