ताज्या बातम्या
मालवण ग्रामीण रुग्णालयातील 'क्ष - किरण' यांत्रिक तपासणी सुविधा पूर्ववत. ॲड. देवदत्त परुळेकर यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा अध्यात्मिक वाङ्मय पुरस्कार जाहीर. सेवानिवृत्त बॅंक कर्मचारी सतीश सुरेश कासले यांचे निधन. श्री भैरवी मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त भजन महोत्सव. व्हाॅइस ऑफ मीडिया दोडामार्गच्या वतीने श्रमदानातून बंधारा. ‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...!
मालवण ग्रामीण रुग्णालयातील 'क्ष - किरण' यांत्रिक तपासणी सुविधा पूर्ववत.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण ग्रामीण रुग्णालयातील 'क्ष - किरण' यांत्रिक तपासणी सुविधा पूर्ववत.

मालवण ग्रामीण रुग्णालयातील 'क्ष - किरण' यांत्रिक तपासणी सुविधा पूर्ववत. 

Article image

नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांचा पाठपुरावा.


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण ग्रामीण रुग्णालय येथील 'क्ष - किरण तपासणी यंत्र तथा एक्स - रे मशीन' नादुरुस्त असल्याने काही दिवस बंद असलेली क्ष - किरण यांत्रिक तपासणी सुविधा पूर्ववत करण्यात आली असून नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी याबाबत विशेष पाठपुरावा केला होता अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ. बालाजी पाटील यांनी दिली आहे. 


दरम्यान, मालवण ग्रामीण रुग्णालय येथे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून 'नवीन अत्याधुनिक एक्स - रे मशीन' उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पाठपुरावा सुरु असल्याचे नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी सांगितले आहे .


मालवण ग्रामीण रुग्णालय येथे असलेली एक्स - रे मशीन जीर्ण झाली आहे. काही दिवसांपूर्वी एक्स - रे मशीन नादुरुस्त झाल्याने सेवा ठप्प झाली होती. नगराध्यक्ष ममता वराडकर यांनी आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. 


मालवण ग्रामीण रुग्णालय येथे एक्स-रे मशीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी या ठिकाणी असलेली जीर्ण एक्स-रे मशीनची निर्लेखन व अन्य तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून नवीन अत्याधुनिक एक्स-रे मशीन रुग्णांच्या सेवेत उपलब्ध करून दिली जाणार आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देत सर्वच ठिकाणी गतिमानरित्या कामे सुरू आहेत अशी माहिती मिळत आहे. 


खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या आरोग्य सेवेसाठी सजग व प्रयत्नशील असल्याचे नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी सांगितले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स