मालवणात कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून २७५ रुग्णांची तपासणी.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ.
मालवण | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आयोजित कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेला मालवण ग्रामीण रुग्णालयात प्रतिसाद मिळाला. अत्याधुनिक कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून २७५ रुग्णांची मौखिक (Oral), गर्भाशय ग्रीवा (Cervical) आणि स्तनाच्या (Breast) कर्करोगासाठी तपासणी, स्क्रीनिंग आणि समुपदेशन करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ फित कापून करण्यात आला.
लोकांमध्ये कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करणे, त्यांच्या मनातील भीती कमी करणे आणि कर्करोगाची सुरुवातीची चिन्हे व लक्षणे ओळखण्यास मदत करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास त्यावर प्रभावी उपचार करणे शक्य होते, ज्यामुळे रुग्णांचे जीवन वाचवता येते.
या शिबिरात एकूण २७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली, ज्यात ४९ महिलांची गर्भाशय ग्रीवा कर्करोगासाठी तर १५२ महिलांची स्तनाच्या कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली. याव्यतिरिक्त, ४९ रुग्णांची ‘Via Pap’ चाचणी, ७ रुग्णांची बायोप्सी, ८८ रुग्णांची हिमोग्लोबिन (Hb) तपासणी, २७५ रुग्णांचे रक्तदाब (BP) आणि रक्तातील साखरेची (BSL) तपासणी करण्यात आली. १३९ रुग्णांची संपूर्ण रक्त तपासणी (CBC), ११९ रुग्णांची Hba1c, १२५ रुग्णांची A125 आणि ४२ रुग्णांची CA 19.9 तपासणी करण्यात आली. तसेच, ४९ अन्य प्रयोगशाळा चाचण्याही घेण्यात आल्या. आरोग्य सुविधांसोबतच, ९ उपस्थितांचे आयुष्यमान कार्ड (Ayushman Card) देखील यावेळी काढून देण्यात आले, ज्यामुळे त्यांना पुढील आरोग्य सुविधांचा लाभ घेता येईल.
या शिबिराला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी भेट देऊन कामकाजाचा सखोल आढावा घेतला आणि आवश्यक मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ, डॉ. बालाजी पाटील, तालुका आरोग्य अधिकारी (THO) डॉ. सुधीर धनगे, NCD समन्वयक श्री. केतन कदम आणि NTCP चे श्री. संतोष खानविलकर हे देखील उपस्थित होते.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासोबत शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, महिला जिल्हा समन्वयक सौ. सामंत, शहरप्रमुख दीपक पाटकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, मंदार लुडबे, जॉन नरोना, महिला तालुका प्रमुख मधुरा तुळसकर, तालुका समन्वयक कविता मोंडकर, उप तालुका प्रियांका मेस्त्री, प्रियांका कुमावत, आशा वळपी, रिया कुबल, शीला लाड, गीता नाटेकर, ऋषिकेश सामंत, रश्मी तुळसकर, स्नेहा घाडीगावकर, पंकज पेडणेकर, अभय कदम, अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष मार्टिन फर्नांडिस, लुद्दीन फर्नांडिस, प्रणिता रेवंडकर, दिपाली कोल्थरकर, क्रांती धुरी, रेवती राणे, सामंत यांसह अन्य शिवसैनिक नागरिक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)