श्री गणेशोत्सव पार्श्वभूमीवर शहर प्रमुख दिपक पाटकर यांनी प्रशासकीय विभागांचे वेधले लक्ष.
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील खड्डेमय रस्ते, रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी, बंद स्ट्रीट लाईट व हायमास्ट टॉवर यांसह विविध प्रश्नी शिवसेना शहर प्रमुख दिपक पाटकर यांनी सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता सावंतवाडी तसेच मुख्याधिकारी मालवण नगरपरिषद यांचे लक्ष वेधले.

विभागांना दिलेल्या निवेदनांमधून शहर प्रमुख दीपक पाटकर यांनी सांगितले की, आमदार निलेश राणे जनतेला अधिकाधिक सेवा सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मोठया प्रमाणात विकासनिधी आणत आहेत. जन हिताच्या दृष्टीने नवनवीन विकासकामे होत आहेत. त्यामुळे जनतेला कोणताही त्रास होता नये तत्पर सेवा सुविधा मिळाल्या पाहिजेत यावर त्यांचे विशेष लक्ष आहे. श्रावण महिन्यात अनेक मंदिरात होणारे उत्सव तसेच आगामी श्री गणेशोत्सव लक्षात घेता लवकरात लवकर सूचित केलेली कामे पुर्ण करावी अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त होत आहे.
मालवण कसाल मार्ग, मालवण सागरी मार्ग तसेच मालवण शहरातील ज्या मार्गांवर खड्डे आहेत ते योग्य पद्धतीने बुजवावेत, वाहतूमुकिस अडथळा ठरणारी रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी तोंडणे याबाबत निवेदन बांधकाम विभागास देण्यात आले आहे. तर नगरपरिषद मुख्याध्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मालवण शहरातील अंतर्गत रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवणे. बंद पथदीप, हायमास्ट दुरुस्ती, सिमेंट पायवाटावर जमा झालेला शेवाळ ब्लिचिंग पावडर टाकून व साफसफाई करून दूर करणे, श्री गणेश घाट ठिकाणी व्यवस्था करणे, वाहतूक व पार्किंग बाबत नियोजन करणे ह्या व अशा सर्व बाबी प्रशासनाने वेळेत पूर्ण करून घ्याव्यात जनसेवेच्या कामात कोणतेही सहकार्य लागल्यास आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तत्पर असल्याचे दीपक पाटकर यांनी सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)