ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
कुडाळ येथे जागतिक परिचारिका दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न.

कुडाळ येथे जागतिक परिचारिका दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न.

प्रकाशन: 15 May 2025 01:31 PM
वाचन संख्या 58

कुडाळ | ब्यूरो न्यूज : बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज कुडाळ येथे, जागतिक परिचारिका दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न झाला. सहा. धर्मादाय आयुक्त अवंतिका कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या.

दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन व फ्लोरेन्स नाईंटीगल यांची प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमास व्यासपीठावर बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, नर्सिंग कॉलेज प्राचार्या सौ. कल्पना भंडारी, प्रा.सौ. वैशाली कोलगावकर, सौ. शांभवी आजगावकर, सौ. सुमन करंगळे, प्रणाली मयेकर, प्रथमेश हरमलकर, वैजयंती नर, शंकर माधव आदी उपस्थित होते.

नर्सिंग कॉलेज प्राचार्या सौ. कल्पना भंडारी व मान्यवर यांनीही सर्व विद्यार्थी विद्यार्थीनींना परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी भित्तीपत्रिका, आणि वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी या स्पर्धांच्या विजेत्यांचे पारितोषिक वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शैक्षणिक वर्षात विविध कलागुणांमध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे देखील गुणगौरव या दिनाचे औचित्य साधून करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सेजल नाईक यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स