ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
१४ ते २५ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात लेझर लाईट व बीम्स उपकरणांच्या वापरास मनाई.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

१४ ते २५ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात लेझर लाईट व बीम्स उपकरणांच्या वापरास मनाई.

१४ ते २५ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात लेझर लाईट व बीम्स उपकरणांच्या वापरास मनाई.


सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : गणेशोत्सवाच्या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात लेझर लाईटचा वापर करण्यात येण्याची शक्यता असते. लेझर लाईट डोळ्यांवर पडल्याने वृद्ध व्यक्ती, लहान मुले तसेच किशोरवयीन व्यक्तींच्या डोळ्यांना इजा होऊन दृष्टीदोष निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ अन्वये जिल्ह्यात लेझर लाईट/बीम्स उपकरणांच्या सार्वजनिक वापरास दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी ००.०१ वाजल्यापासून ते २५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ पर्यंत कोणत्याही व्यक्तीस लेझर लाईट/बीम उपकरणे सार्वजनिक वापरण्यास मनाई आदेश जारी केला आहे. 


गणेशोत्सव हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशमूर्ती आगमन, घरगुती गणेशमूर्ती विसर्जन, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका तसेच अन्य कार्यक्रमांदरम्यान लेझर लाईट डोळ्यांवर पडल्यामुळे वृद्ध व्यक्ती, लहान मुले व किशोरवयीन व्यक्तींच्या डोळ्यांना इजा होऊन दृष्टीदोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा उपकरणांचा अनियंत्रित वापर टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.


या कालावधीत काही अपरिहार्य कारणासाठी लेझर लाईट / बीम्स उपकरणांचा वापर करणेचा असल्यास पोलीस अधिक्षक सिंधुदुर्ग यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३ तसेच इतर लागू असलेल्या कायद्यांनुसार शिक्षेस पात्र कारवाई करण्यात येणार आहे. 



(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स