सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने कर्करोग तपासणी मोहीम.
आचरा, मालवण व चौके याठिकाणी उपलब्ध असणार कर्करोग मोबाईल व्हॅन.
मालवण | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र शासन मार्फत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम सुरू आहे.
या अनुषंगाने कर्करोग मोबाईल व्हॅन १४ जुलै रोजी आचरा प्राथमिक आरोग्य केंद्र, १५ जुलै मालवण ग्रामीण रुग्णालय, १६ जुलै चौके प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी ही व्हॅन सकाळी ९:०० ते ५:०० या वेळेत उपलब्ध असणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)