ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वळीवंडे गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण कदम यांची बिनविरोध निवड
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वळीवंडे गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण कदम यांची बिनविरोध निवड

प्रकाशन: 29 Oct 2021 12:18 PM
वाचन संख्या 164

शिरगांव /संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील वळीवंडे गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी माजी शिक्षण विस्तार अधिकारी बाळकृष्ण शंकर कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
बाळकृष्ण कदम यांनी ३८ वर्षे शिक्षकी पेशात चांगल्याप्रकारे सेवा केली.सन २००१ साली ते वयोमानानुसार शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले.सामाजिक,शिक्षणक्षेत्रात त्यांना काम करण्याची खूप आवड आहे.गावच्या विकासकामत त्यांचे मोलाचे योगदान आहे.सद्या ते वळीवंडे -कदमवाडी नळयोजना समिती अध्यक्ष,वळीवंडे-कदमवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष, ग्रामस्थ हितवर्धक मंडळ-वळीवंडेचे खजिनदार,वळीवंडे काँग्रेस गावकमिटीचे माजी अध्यक्ष,शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ म्हणून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
त्यांची वळीवंडे गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल प.स.देवगड चे माजी सभापती रवींद्र जोगल,नंदू देसाई,वळीवंडे हितवर्धक मुंबई मंडळाचे अध्यक्ष केशवभाई सावंत,भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम,सरपंच सौ.अर्चना घाडी,ग्रामसेवक,ग्रामस्थांनी विशेष अभिनंदन केले आहे.वळीवंडे परिसरात त्यांना सर्वजण आदराने “कदमगुरुजी” असे म्हणतात.मनमिळाऊ आणि मृदूभाषा असा त्यांचा स्वभाव आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स