ताज्या बातम्या
श्री. हरी खोबरेकर व कै. आतु फर्नांडिस मित्रमंडळ, गवंडीवाडा 'गणेश विसर्जन' पथकाच्या वतीने श्री गणेश मूर्ती विसर्जनास सहकार्य. ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करून सेवा संकल्प दृढ़. माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक.
श्री स्वामी समर्थ मठ हडपीडचे संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर यांच्या पुढाकारातून ​गुरुपौर्णिमेनिमित्त विविध वृद्धाश्रमांना अन्नधान्य व वस्त्रांचे वाटप.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

श्री स्वामी समर्थ मठ हडपीडचे संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर यांच्या पुढाकारातून ​गुरुपौर्णिमेनिमित्त विविध वृद्धाश्रमांना अन्नधान्य व वस्त्रांचे वाटप.

श्री स्वामी समर्थ मठ हडपीडचे संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर यांच्या पुढाकारातून ​गुरुपौर्णिमेनिमित्त विविध वृद्धाश्रमांना अन्नधान्य व वस्त्रांचे वाटप.

Article image


​मसुरे | प्रतिनिधी : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ मठ हडपीड (देवगड) चे संस्थापक सचिव अक्कलकोट भूषण स्वामीरत्न पुरस्कार प्राप्त नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही गरजू व वृद्धाश्रमांतील सदस्यांना अन्नधान्य आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले. श्री. पेडणेकर हे गेल्या तीन दशकांपासून सामाजिक क्षेत्रात सेवाभावीपणे काम करत आहेत. आनंदाश्रय आणाव येथे नंदकुमार पेडणेकर यांनी उपस्थित संस्थाचालक, सहकारी आणि वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना संबोधित करताना त्यांचे मनोगत व्यक्त केले.


​गुरुपौर्णिमेचा खरा अर्थ केवळ पूजन करणे नसून, समाजात ज्यांना मदतीची गरज आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हाच आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आणि विचारांनी प्रेरित होऊन आम्ही गेल्या तीन दशकांपासून ही सेवा अविरतपणे करत आहोत. ही सेवा म्हणजे स्वामींच्या चरणी अर्पण केलेले पुष्प आहे. आमच्या या कार्यात माझ्या सर्व सहकाऱ्यांचे नेहमीच मोलाचे सहकार्य लाभले आहे. ​या उपक्रमांतर्गत श्री. पेडणेकर यांच्यासोबत त्यांचे सहकारी विजय धाटावकर, प्रभाकर यशवंत राणे, अनंत जंगम, नितीन म्हापसेकर, मधुसूधन भडसाळे, देविदास डोंगरे, सचिन लोके आणि समीर शिरवाडकर यांनी उपस्थित राहून दिविजा वृद्धाश्रम (असलदे, देवगड), जीवदान विशेष शाळा (झाराप, कुडाळ), जीवन संजीवन सेवा ट्रस्ट - आनंदाश्रय (अणाव, कुडाळ), जीवन आनंद संस्था (पणदूर, कुडाळ) या चार विविध संस्थांमध्ये साहित्याचे वाटप केले. ​


प्रत्येक आश्रमाला १०४ किलो​ कोलम तांदूळ, २५ किलो ​तूरडाळ, ४५ लीटर गोडेतेल, १० ​टॉवेल, २५ ​साड्या देण्यात आल्या. ​मदतीचे हे साहित्य स्वीकारल्यानंतर सर्व संस्था व वृद्धाश्रमांच्या संचालकांनी तसेच उपस्थित वृद्धांनी, दातृत्व सेवेशी संबंधित सर्वांचे आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स