ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
डाॅ.निलेश राणे यांच्याहस्ते झाले कणकवली गावठी आठवडा बाजारचे उद्घाटन..!

डाॅ.निलेश राणे यांच्याहस्ते झाले कणकवली गावठी आठवडा बाजारचे उद्घाटन..!

प्रकाशन: 29 Oct 2021 01:15 PM
वाचन संख्या 72

शेतकरी जगला पाहिजे हे आपले ब्रीदवाक्य असल्याचे डॉ निलेश राणे यांचे प्रतिपादन

कणकवली | उमेश परब : शेतकरी टिकला तर महाराष्ट्राची भरभराट होईल.राज्यात विकासाची गंगा येईल म्हणून माय बाप शेतकऱ्यांना तारले पाहिजे.त्याच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून दिली पाहिजे.महाराष्ट्र राज्याती आणि कोकणातील शेतकरी नैसर्गिक संकटांना सामोरे जात जे कष्ट भोगत आहे त्या शेतकऱ्यांना या ठाकरे सरकाने उद्धवस्त केले.शेतकरी जगला पाहिले , टिकला पाहिजे यासाठी ठाकरे सरकारने काही केले नाही मात्र कणकवली पंचायत समितीने करून दाखवले.शेतकऱ्यांनच्या हितासाठी असे गावठी आठवडा बाजारासारखे उपक्रम सातत्याने चालू ठेवा असे आवाहन भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी केले.
कणकवली पंचायत समिती आणि स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघ सिंधुदुर्ग च्या वतीने आयोजित गावठी भाजी पाला,धान्य,वस्तू,खाद्यपदार्थ यांचा आठवडा बाजार पुन्हा सुरू करण्यात आला.भाजपा नेते निलेश राणे यांच्या हस्ते फिट कापून त्याचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी कणकवली सभापती मनोज रावराणे यांनी त्याचे स्वागत केले.कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.संजना सावंत,नगराध्यक्ष समीर नलावडे, अभिनेता अनिल गवस, गटविकास अधिकारी चव्हाण,उप सभापती प्रकाश पारकर,माजी सभापती भाग्यलक्षमी साटम,भाजपा तालुका अध्यक्ष संतोष कानडे, शहर अध्यक्ष अण्णा कोदे,सोनू सावंत भाजपा युवकचे संदीप मेस्त्री, शामु दळवी, सूर्यकांत वारंग,स्नेह सिंधूचे हेमंत सावंत, पंकज दळी, व्ही.के. सावंत, संदीप राणे,आदी उपस्थित होते.
भाजपा नेते निलेश राणे म्हणाले,शेतकऱ्यांना माल विकण्यासाठी बाजारपेठेत उभी करून दिली त्याचे मला समाधान वाटते. कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे आणि त्यांचे सहकारी चालगे उपक्रम राबवित आहेत.हा गावठी आठवडा बाजार असाच कायम सुरू ठेवा त्याचे सातत्य कायम ठेवा.अजून शेतकरी जोडावेत असे आवाहन श्री.निलेश राणे यांनी केले.
शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षात ठाकरे सरकारने उद्धवस्त केले. नुकसानभरपाई नाहीच तर साधी विचारपूस सुद्धा केलेली नाही.आपले आमदार नितेश राणे राज्य सरकारच्या विरुद्ध कायम भांडतात.मात्र सरकारला जाग येत नाही.अशी टीका केली.
अभिनेते अनिल गवस म्हणाले,
रायगडावर त्याकाली छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजारपेठ उभी केली, तशी ही बाजारपेठ आहे.एकमेकांसाठी हात दिला पाहिजे. भावासाठी भाऊ उभा राहतो हे आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांचे उदाहरण आपल्या समोर आहे. प्रेम असेच आपणही एका दुसऱ्यांसाठी काम केले पाहिजे.आठवड्याला या आणि खरेदी करा.ग्राहक म्हणून तुमची या शेतकऱ्यांना गरज आहे असे अभिनेते अनिल गवस म्हणाले.आभार उपसभापती मनोज रावराणे यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स