शिष्यवृत्ती परीक्षेत दक्षेश मांजरेकर ग्रामीण सर्वसाधारण मधून सिंधुदुर्ग जिह्यात प्रथम.
मसुरे | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील श्री भगवती हायस्कूल, मुणगे येथील इयत्ता आठवीतील विद्यार्थी कु. दक्षेश गुरुप्रसाद मांजरेकर महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ मध्ये ग्रामीण सर्वसाधारण मधून सिंधुदुर्ग जिह्यात प्रथम आला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणारी ही शिष्यवृत्ती परीक्षा स्पर्धात्मक असते. या परीक्षेत दक्षेशने २२४ गुण मिळवत ग्रामीण सर्वसाधारण मधून सिंधुदुर्ग जिह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. शाळा व संस्थेच्या वतीने दक्षेशचा विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी शालेय समिती सदस्य संजय बांबूळकर, कार्यकारणी सदस्य धर्माजी आडकर, मुख्याध्यापिका एम. बी. कुंज, गौरी तवटे, हरिदास महाले, प्रसाद बागवे, रश्मी कुमठेकर,नामदेव बागवे, स्वप्नील कांदळगावकर, सुविधा बोरकर, तेजल बागडे, मुणगेकर आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)