मुणगे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न.
मुणगे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न.
रिक्षा चालक - मालक संघ भगवती हायस्कूल तिठा व विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली यांचा संयुक्त उपक्रम
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मुणगे येथील रिक्षा चालक - मालक संघ भगवती हायस्कूल तिठा आणि विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबीराचा ७४ रुग्णांनी लाभ घेतला.
भगवती हायस्कूल तिठा तेथील रिक्षा चालक - मालक संघाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने निरामय क्लिनिक, डॉ. चिन्मय लब्दे यांच्या भगवती हायस्कूल तिठा येथील बापूसाहेब पंतवालावलकर स्मृतिभवन येथील दवाखान्यामध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन संघटनेचे अध्यक्ष सुनील पुजारे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना सामाजिक कार्यकर्ते देवदत्त उर्फ आबा पुजारे यांनी रिक्षा चालक - मालक संघाच्या या सामाजिक उपक्रमाची प्रशंसा केली. ग्रामीण भागातील लोकांसाठी ही नेत्रतपासणी अत्यंत उपयुक्त ठरेल अशा शब्दांत त्यांनी संघटनेला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ. चिन्मय लब्दे, लक्ष्मीकांत मालाडकर, प्रशांत महाजन, मंगेश लब्दे, सुभाष राणे, प्रविण कोन्नुर, नागेश घाडी, सदाशिव परब, कृष्णा उर्फ दादा सावंत, मंदार मुणगेकर आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या मोफत नेत्रतपासणी शिबिरामध्ये सिद्धेश घारे आणि दीपिका पुजारे यांनी सहकार्य केले. या शिबिराच्या माध्यमातून २७ जणांना अल्प दरात चष्मा उपलब्ध होणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)