ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
मुणगे गावाला रुग्णसेवेसाठी इसीजी मशीन भेट.

मुणगे गावाला रुग्णसेवेसाठी इसीजी मशीन भेट.

प्रकाशन: 06 Jul 2025 10:18 PM
वाचन संख्या 87

मसुरे | प्रतिनिधी : मुणगे भंडारवाडी यांच्या वतीने कै. समीर सुधीर मुणगेकर यांच्या स्मरणार्थ गावातील रुग्णसेवेसाठी इसीजी मशीन भेट देण्यात आली. येथील श्री दत्त कृपा क्लीनिक येथे माफक दरात या मशीन द्वारे इसीजी काढता येणार आहे. सदर मशीन माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष दिगंबर पेडणेकर यांच्या हस्ते डॉ. सुजित कदम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी डॉ. के. एन. नायसे, माजी सरपंच सौ. साक्षी गुरव, मुणगे सोसायटी अध्यक्ष गोविंद सावंत, पोलीस पाटील सौ. साक्षी सावंत, देवदत्त पुजारे, देवस्थान उपाध्यक्ष सुधीर महाजन, सचिव निषाद परुळेकर, मनोज सावंत, युवा उद्योजक अनुप मुणगेकर, विनय मुणगेकर, सतीश पेडणेकर, सुदीप मुणगेकर, बाबा मेस्त्री, दादा वळंजू यांसह भंडारवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी डॉ. के. एन. नायसे, डॉ. सुजित कदम यांनी मशीन भेट दिल्याबद्दल भंडारवाडी वासियांचे आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स