फणसगाव येथे ऐलमा पैलमा अक्षर देवा महिला साहित्यिक समूह, सिंधुदुर्गचा साहित्यिक मेळावा उत्साहात.
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील ज्ञानवर्धिनी सार्वजनिक वाचनालय, विठ्ठलादेवी, फणसगाव येथे ऐलमा पैलमा अक्षर देवा महिला साहित्यिक समूह, सिंधुदुर्गचा साहित्यिक मेळावा रविवार, २२ जून रोजी संपन्न झाला. सकाळच्या सत्रात कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत, समूहाचे प्रतीक असलेल्या रुजवणाला जलसिंचन करण्यात आले.
समूहातील सदस्य अनुराधा दीक्षित, डॉ. ज्योती तोरसकर, ॲड. अपर्णा प्रभू परांजपे, ॲड. अंजली मुतालिक, डॉ. गौरी गणपत्ये, मंदाकिनी गोडसे, देवयानी आजगावकर, स्वाती सावंत, स्मिता नाईक व अलका नारकर यांचा विशेष कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला. त्यानंतर ‘कथेच्या जन्माची कथा, या विषयावर चर्चा आणि अनुभवकथन करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांच्या ‘आकांताच्या काठावर’ या कथेवर आधारीत व कथेच्या अनुषंगाने आयोजित चर्चासत्रात सर्वांनी सहभाग घेतला. प्रा. डाॅ. सुमेधा नाईक यांनी या चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले.
दुपारच्या सत्रात समूहातील सदस्यांचा साहित्य सादरीकरणाचा कार्यक्रम फणसगाव मधील बचतगटांतील महिला प्रेक्षकांच्या उपस्थितीत सादर झाला. यावेळी सरपंच ज्योती नारकर तसेच वाचनालयाचे ग्रंथपाल श्री. संदीप धुरी व कर्मचारी सौ. सायली धुरी यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता ‘हेची दान दे गा शब्दा’ या प्रार्थनेने झाली.
यावेळी ऐलमा पैलमा अक्षर देवा महिला साहित्यिक समूहातील ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित, मंदाकिनी गोडसे, अनुराधा दीक्षित, सुनंदा कांबळे, संगीता तोरसकर, अलका नारकर, डॉ. सई लळित, डॉ. सुमेधा नाईक, डॉ. ज्योती तोरसकर, डॉ. स्नेहल फणसळकर, डॉ. मेधा फणसळकर, ॲड. अंजली मुतालिक, ॲड. अपर्णा प्रभू परांजपे, डॉ. गौरी गणपत्ये, स्मिता नाईक, देवयानी आजगावकर, स्वाती सावंत, माधुरी जोशी तसेच सरपंच फणसगाव सौ. ज्योती नारकर, बचतगट महिला सदस्या आणि ग्रंथपाल श्री. संदीप धुरी, सौ. सायली धुरी व साहित्यप्रेमी उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल फणसळकर यांनी केले तर आभार वाचनालयाच्या कार्यवाह सौ. अलका नारकर यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)