श्री देव कुणकेश्वर मंदिरात दुसऱ्या श्रावण सोमवारी माजी आमदार वैभव नाईक यांची सपत्नीक 'प्रथम मानाची' पूजा.
श्री देव कुणकेश्वर मंदिरात दुसऱ्या श्रावण सोमवारी माजी आमदार वैभव नाईक यांची सपत्नीक 'प्रथम मानाची' पूजा.
ब्यूरो न्यूज : श्रावण महिन्यातील आज दुसऱ्या सोमवारी, दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी, श्री देव कुणकेश्वर मंदिरात माजी आमदार वैभव नाईक यांना प्रथम पूजेचा मान देण्यात आला. आज पहाटे माजी आमदार वैभव नाईक व पत्नी स्नेहा नाईक यांनी मंदिरात उपस्थित राहून विधिवत पूजन करून आरती केली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, मंदिर समितीचे अध्यक्ष एकनाथ तेली, उपाध्यक्ष गणेश वाळके, श्री पेडणेकर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)