ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
मसुरे येथे भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गच्या वतीने २० जुलै रोजी मालवण तालुकास्तरीय कार्यशाळा.

मसुरे येथे भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गच्या वतीने २० जुलै रोजी मालवण तालुकास्तरीय कार्यशाळा.

प्रकाशन: 18 Jul 2025 11:31 AM
वाचन संख्या 307

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील सर्व संगीत, वारकरी भजनी बुवा, पखवाज वादक, तबलावादक, झांज वादक, कीर्तनकार, कोरस, नवोदित कलाकार,अन्य भजनी क्षेत्रातील कलाकारांना विनंती करण्यात येते की आपल्या सर्वांची नुकतीच स्थापन झालेली ‘भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग’ हिला शासन दरबारी मान्यता मिळाली असून संस्थेचे कार्यकारी मंडळ व या क्षेत्रातील मान्यवर आपल्या भेटीसाठी व चर्चा विचारविनिमय करून निर्णय घेण्यासाठी तालुकास्तरीय कार्यशाळा रविवार, २० जुलै रोजी मसुरे येथील भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मसुरे मर्डे सभागृहात या संस्थेचे अध्यक्ष संतोष कानडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.

यावेळी मसुरे येथील प्रसिद्ध उद्योजक तथा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष डॉ. दीपक मुळीक परब, मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक तथा ज्येष्ठ कामगार नेते श्री. प्रकाश परब, भजनसम्राट तथा मानधन समिती सिंधुदुर्गचे सदस्य श्री. भालचंद्र केळुसकर, माजी सभापती तथा मानधन समिती सिंधुदुर्गचे सदस्य अजिंक्य पाताडे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत.

यावेळी कलाकार मानधन विमा योजना, कलाकार ओळखपत्र, भजन परंपरा संवर्धन व जतन, भजन कार्यशाळा मार्गदर्शन शिबिर घेणे, शासकीय योजना कलाकारांसाठी आहेत याविषयी शासन दरबारी पाठपुरावा करणे, नवीन सदस्य नोंदणी, ज्येष्ठ कलाकारांना मार्गदर्शन करणे, अशा विविध प्रश्नांसंदर्भात नियोजन करणे यासाठी सर्वांनी एकत्र येऊन उपस्थिती दर्शवावी, आवाहन भजनी कलाकार संस्थेचे अध्यक्ष श्री. संतोष कानडे बुवा आणि या समितीच्या सर्व पदाधिकारी सदस्य यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स