जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द.
२१ जुलैपर्यंत हरकती पाठविण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन.
सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती, अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा अधिनियम, ५) चे कलम १२ पोटकलम (१) अन्वये सिंधुदुर्ग जिल्हा- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्या जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व कलम ५८ (१) (अ) अन्वये पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणाच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत राज्य शासन किंवा राज्य शासनाने प्राधिकृत केलेला अधिकारी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या आदेश क्रमांक-साशा/डेस्क-1(4),जिपपंस / प्रापर,2025 दिनांक १४ जुलै २०२५ च्या आदेशाच्या मसुद्याची प्रत (शासन राजपत्र,अनुसुची 5अ व 5ब) प्रमाणे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयातील फलकावर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयातील फलकावर, तहसीलदार वैभववाडी, देवगड, कणकवली, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग यांच्या कार्यालयातील फलकावर तसेच पंचायत समिती वैभववाडी, देवगड, कणकवली, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग यांच्या कार्यालयातील फलकावर लावण्यात आली आहे.
उक्त मसुदा राज्य शासन किंवा राज्य शासनाने प्राधिकृत केलेला अधिकारी, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडून त्या आदेशात नमूद केल्यानुसार १४ जुलै २०२५ नंतर विचारात घेण्यात येईल. आदेशाच्या मसुद्यास कुणाची हरकत किंवा सूचना असल्यास त्यासंबंधीची जी सकारण लेखी निवेदने, हरकती, सूचना संबधित तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे २१ जुलै २०२५ पर्यंत सादर करावेत. उपरोक्त तारखेनंतर तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे आलेली निवेदने, हरकती, सूचना इत्यादी विचारात घेतले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)