सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी 'ग्रीन लीफ' मानांकन.
जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचे व्यावसायिकांना आवाहन.
सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासन सरसावले आहे. जिल्ह्यांतील हॉटेल्स, लॉजिंग, धर्मशाळा आणि न्याहरी निवास यांना आता त्यांच्या स्वच्छतेच्या आधारावर ‘ग्रीन लीफ’ मानांकन दिले जाणार आहे. या उपक्रमामुळे देशी – विदेशी पर्यटकांना स्वच्छ आणि दर्जेदार निवासस्थाने निवडणे सोपे होईल, ज्यामुळे जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.
‘ग्रीन लीफ’ रेटिंगसाठी स्वयंमूल्यांकन फॉर्म जिल्हा परिषदेच्या सिंधुदुर्ग संकेतस्थळावर उपलब्ध असून, जिल्ह्यातील सर्व हॉटेल आणि निवास व्यवसायिकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. ग्रीन लीफ रेटिंगची प्रक्रिया आणि निकष पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालय आणि पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये हॉटेल्स, लॉजिंग, धर्मशाळा आणि न्याहरी निवास यांच्या स्वच्छता आणि व्यवस्थापनाचे मूल्यांकन मुख्य निकषांवर आधारित असणार आहेत.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पाणी व स्वच्छता उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, सर्व प्रांताधिकारी व गटविकास अधिकारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)