वडाचापाट हायस्कूलमध्ये जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात.
मसुरे | प्रतिनिधी : कोणताही छंद शंभर दिवस जोपासला की त्याचे रूपांतर व्यवसाय उद्योगात होते. त्यामुळे प्रत्येकाने छंद जोपासायला हवा. सद्या नोकरी मिळणे अशक्य झाले आहे. विद्यार्थांनी आताच आपले ध्येय निश्चित केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रतिभा फिशरीज डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मर्यादित सिंधुदुर्गचे सदस्य श्री. अभिमन्यू गावडे यांनी केले. श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट येथे जागतिक युवा कौशल्य दिन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
विद्यार्थ्यांनी स्वतःचे कौशल्य वापरून बनविलेल्या विविध वस्तूच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून त्यांचे कौतुक केले.
सूत्रसंचालन अभियांत्रिकी विभागाचे निदेशक श्री. जगन्नाथ आंगणे यांनी केले तर टिपणी वाचन आणि लँड अ हॅन्ड इंडिया संस्थेची उद्दिष्टे, तसेच स्कॉलरशिपची माहिती प्रास्ताविकेमध्ये ऊर्जा पर्यावरण विभागाचे निदेशक श्री. केशव भोगले यांनी दिली.
प्रमुख अतिथी श्री. गावडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना शोभिवंत रंगीत मत्स्यपालन यावर विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच आपल्या प्रशालेत लवकरच त्याचे प्रात्यक्षिक घेण्यात येईल अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पी.एच.कुबल यांनी विविध गोष्टी सांगून कौशल्य दिनाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. वेदिका दळवी, सहाय्यक शिक्षिका प्रतिभा केळुसकर उपस्थित होत्या. आभार प्रदर्शन गृह आरोग्य विभागाच्या निदेशिका हर्षदा पाटकर यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)