ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
कट्टा येथील वराडकर महाविद्यालयात करिअर कट्टाच्या करिअर संसदेचा पदग्रहण समारंभ संपन्न.

कट्टा येथील वराडकर महाविद्यालयात करिअर कट्टाच्या करिअर संसदेचा पदग्रहण समारंभ संपन्न.

प्रकाशन: 16 Jul 2025 03:35 PM
वाचन संख्या 63

मालवण | ब्यूरो न्यूज : जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून कट्टा येथील डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात करिअर कट्टाच्या करिअर संसदेचा पदग्रहण समारंभ संपन्न झाला. या करिअर संसदेच्या मुख्यमंत्री पदी कु. प्राची संभाजी परब या विद्यार्थिनीची निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा संचलित डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टा येथे करिअर कट्टा विभाग कार्यरत आहे. या विभागांतर्गत विविध करिअर संबंधी उपक्रम राबविण्यात येतात. या अनुषंगाने जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त करिअर कट्टा विभागांतर्गत करिअर संसदेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शपथ ग्रहण समारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

या करिअर संसदेत पुढील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कु. प्राची संभाजी परब (मुख्यमंत्री), कु. संचिता मंगेश करावडे (नियोजन मंत्री), कु. ऐश्वर्या संभाजी परब (कायदे व शिस्तपालन मंत्री), कु. साहिल आनंद पालव (सामान्य प्रशासन मंत्री), कु. पूजा प्रदीप लाड (माहिती प्रसारण मंत्री), कु. राजकुमार आनंद लोखंडे (उद्योजकता विकास मंत्री), कु. ओम भास्कर टेमकर (रोजगार स्वयंरोजगार मंत्री), कु. भक्ती भाऊ घाडी (कौशल्य विकास मंत्री), कु. सलोनी किशोर पवार (संसदीय कामकाज मंत्री), कु. साक्षी संदीप पालव (महिला व बालकल्याण मंत्री), कु. हर्ष ज्ञानदेव पेडणेकर (सदस्य) यावेळी नवनियुक्त पदाधिकारी यांना महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी व उपप्राचार्य प्रा. रविंद्र गावडे यांच्या हस्ते करिअर कट्टा डायरी, व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून करिअर कट्टा उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या ‘आयएएस आपल्या भेटीला’ व ‘उद्योजक आपल्या भेटीला’ व विविध ऑनलाइन कोर्सेस यांची माहिती देऊन या ऑनलाइन मार्गदर्शनाचा जास्तीत जास्त विद्यार्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपस्थित विद्यार्थांना केले. महाविद्यालयाच्या करिअर कट्टा विभाग प्रमुख प्रा. श्रुती कुंभार व विभाग सहाय्यक प्रा. कांचन खानोलकर या विभागाचे कामकाज पाहत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स