कणकवलीतील भालचंद्र ज्वेलर्स चोरट्यांनी फोडले.
कणकवली | ब्यूरो न्यूज : कणकवली पोलीस स्टेशन पासून काहीशा अंतरावरील भालचंद्र ज्वेलर्स चोरट्यांनी फोडून लाखो रुपयांचे सोने व चांदीचे दागिने लंपास केले. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. ही घटना बुधवारी पहाटे ३ वा. च्या सुमारास घडली. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अतुल जाधव, हवालदार विनोद चव्हाण व त्यांची टीम घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. त्यावेळी सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरटे कोणत्यातरी हत्याराने शटरचे कुलूप तोडताना दिसत आहेत. काही वेळात ठसे तज्ञ व श्वानपथक दाखल होणार आहेत, माहिती मिळत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)