ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
खारेपाटण महाविद्यालयात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या वतीने आपत्तीपूर्व तयारी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.

खारेपाटण महाविद्यालयात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या वतीने आपत्तीपूर्व तयारी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.

प्रकाशन: 14 Jul 2025 10:47 PM
वाचन संख्या 184

खारेपाटण | ब्यूरो न्यूज : खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, एनसीसी व विद्यार्थी कल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्तीपूर्व तयारी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (NDRF) च्या जवानांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या प्रमुख श्रीमती राजश्री सामंत यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत व सत्कार महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर इन्स्पेक्टर आर. जे. यादव यांनी आपत्तीपूर्व तयारीचे महत्त्व पटवून देत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह प्रशिक्षणाची सुरुवात केली. छत्रपती खांदवे यांनी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण स्पष्ट केले.

या प्रशिक्षणात ए.एस.आय. विजय म्हसके, ए.एस.आय. दुर्वेश कुमार, हवालदार प्रदीप पाटील, हवालदार झेंडे, हवालदार फापले, हवालदार श्रीमती उज्वला फडतरे, कॉन्स्टेबल अजहर सय्यद, कॉन्स्टेबल गौरेश थवकर, कॉन्स्टेबल संदीप, कॉन्स्टेबल श्रीणू बाबू, कॉन्स्टेबल शानमुखा, कॉन्स्टेबल विकास, कॉन्स्टेबल शरद व कॉन्स्टेबल श्रीमती प्रीती कुमारी यांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.

या प्रसंगी खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. संजय सानप, पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत, ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक श्री. अजय गुरसाळे, खारेपाटण गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा माजी सरपंच श्री. रमाकांत राऊत तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. गावातील नागरिकांनी आणि विद्यार्थी वर्गाने कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपत्ती व्यवस्थापना संदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी आत्मसात केल्या.

या प्रशिक्षण कार्यक्रमात विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक उपचार, बचाव कार्य, सुरक्षित स्थळी स्थलांतर, अग्निशमन उपाययोजना, जलतरण सहाय्य, इमारतींच्या दुर्घटना यासंबंधीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक NDRF पथकाने सादर केले. तर महाविद्यालयाच्या वतीने सहभागी जवानांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनएसएस कार्यक्रम अधिकारी व सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री. वसीम सय्यद यांनी केले. पाहुण्यांची ओळख श्रीमती रश्मी देसाई यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रणय माने यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स